Next
इंद्रियधून
BOI
Friday, July 26, 2019 | 10:13 AM
15 0 0
Share this article:

चीनी सैनिकांच्या काळकोठडीतून सुटून त्सेवांग तिबेट सोडणाऱ्यांच्या जथ्यात सामील होतो. तिबेट ते नेपाळ या प्रवासात अनेक जीवघेणे थरारक प्रसंग येतात. त्यातूनही सहीसलामत बाहेर पडून त्सेवांग नेपाळला पोहोचतो. पूर्वी झालेल्या अपघातात तो चव आणि गंध यांची संवेदना हरवून बसलेला असतो; पण तेथे एका हॉटेलमध्ये डॉली दिसते. तो जणू तिच्या प्रेमातच पडतो. पुढे डॉलीचा चेहरा व त्यावरील हावभावावरून त्सेवांग पदार्थांचा गंध व चव ओळखू लागतो. 

नेपाळमधील तिबेटी लोकांच्या पुनर्वसन केंद्रात त्याला गोशेल भेटतो. त्याच्या मदतीने त्सेवांगचा भारतात प्रवेश होतो. त्या दोघांचीही ताटातूट होते. एकाकी असलेल्या त्सेवांगला विशाल, अभय भेटतात. पुढे त्याला पेशाने पत्रकार असलेला अविनाश भेटतो. त्सेवांगची रोमहर्षक कथा त्याच्याच मदतीने पुढे सरकते. अखेर त्सेवांगला त्याची माणसे भेटतात. त्याला त्यांच्याबरोबर सोडून अविनाश घरी येतो. त्सेवांगच्या कथेतील माणसे शोधताना त्याच्यासमोर वेगळेच काही येते. प्रणव गायगवळी यांच्या लेखणीतून उतरलेली तिबेटी त्सेवांगची ही अद्भुत रम्य कथा ‘इंद्रियधून’मधून वाचायला मिळते.

पुस्तक : इंद्रियधून
लेखक : प्रणव गायगवळी
प्रकाशक : बुकगंगा पब्लिकेशन्स
पाने : १९२
किंमत : २७५ रुपये
     
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search