Next
ना. ग. गोरे, शंकर वैद्य, सरोजिनी वैद्य, शांताराम, अर्जुन डांगळे
BOI
Friday, June 15, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

समाजवादी नेते ना. ग. गोरे, ‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ ही कविता लिहिणारे कवी शंकर वैद्य, लेखिका सरोजिनी वैद्य, कथाकार शांताराम आणि दलित साहित्यामधले प्रसिद्ध लेखक अर्जुन डांगळे यांचा १५ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
....
नारायण गणेश गोरे 

१५ जून १९०७ रोजी हिंदळे गावात (देवगड) जन्मलेले नारायण गणेश गोरे हे प्रख्यात समाजवादी नेते आणि विचारवंत लेखक म्हणून ओळखले जातात. राजकारणात सक्रिय असतानाही त्यांनी सामाजिक, वैचारिक आणि ललित लेखन केलं होतं. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या नानासाहेब गोरे यांनी स्वातंत्र्यानंतर राजकारणात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं; पण त्याचबरोबर लेखनही केलं. साधना साप्ताहिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केलं.

करवंदे, सीतेचे पोहे, गुलबशी, शंख आणि शिंपले, चिनारच्या छायेत, काही पाने काही फुले, कारागृहाच्या भिंती, समाजवादच का?, भारताची पूर्व सरहद्द, तापू लागलेला हिमालय, असं त्याचं लेखन प्रसिद्ध आहे. त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं होतं. 

एक मे १९९३ रोजी त्यांचं निधन झालं. 

(ना. ग. गोरे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
......

शंकर विनायक वैद्य

१५ जून १९२८ रोजी ओतूरमध्ये (पुणे) जन्मलेले शंकर वैद्य हे कवी, समीक्षक, कथाकार, वक्ते आणि प्रभावी सूत्रसंचालक अशा विविध पैलूंमुळे प्रसिद्ध होते. तरल भाषेत सोपं आणि सहजसुंदर लेखन हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्यांनी आपल्या कवितांमधून जीवनातल्या विविध प्रकारच्या अनुभूतींचं आविष्करण केलं. मराठी काव्यपरंपरेच्या सखोल अभ्यासातून त्यांनी संतकवींपासून ते केशवसुत- मर्ढेकरापर्यंतच्या काळातल्या कवींवर व्याख्यानं दिली आणि उत्तम समीक्षात्मक लेखनही केलं. 

कालस्वर, दर्शन, प्रवासी पक्षी, वेणा, आला क्षण गेला क्षण, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. त्यांना महाराष्ट्र शासन पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषद पुरस्कार, वाग्विलासिनी पुरस्कार, दीनानाथ प्रतिष्ठान पुरस्कार असे अनेक पुरस्कार लाभले होते. 

२३ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांचं निधन झालं. 

(शंकर वैद्य यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

.........

सरोजिनी शंकर वैद्य

१५ जून १९३३ रोजी अकलूजमध्ये जन्मलेल्या सरोजिनी वैद्य या ललितलेखिका, चरित्रकार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक म्हणून त्यांनी योगदान दिलं होतं.

आठवणी काळाच्या माणसांच्या, कहाणी लंडनच्या आजीबाईंची, पहाटगाणी, शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व, संक्रमण, माती आणि मूर्ती, रमाबाई रानडे : व्यक्ती आणि कार्य, नानासाहेब फाटक : व्यक्ती आणि कला, समग्र दिवाकर, वासुदेव बळवंत पटवर्धन : जीवन आणि लेखन, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

तीन ऑगस्ट २००७ रोजी त्यांचं निधन झालं.

(सरोजिनी वैद्य यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
......

केशव जगन्नाथ पुरोहित

१५ जून १९२३ रोजी चामोर्शीमध्ये (चंद्रपूर) जन्मलेले केशव जगन्नाथ पुरोहित ऊर्फ शांताराम हे कथाकार आणि कादंबरीकार म्हणून ओळखले जातात.

संत्र्याची बाग, मनमोर, शिरवा, छळ, जमिनीवरची माणसं, अंधारवाट, सावळाच रंग तुझा, हेल्गेलंडचे चांचे, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
 
१९८९ साली अमरावतीमध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. 

(शांताराम यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
............

अर्जुन उमाजी डांगळे 

१५ जून १९४५ रोजी जन्मलेले अर्जुन उमाजी डांगळे हे कवी आणि कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. दलित पँथर आणि दलित साहित्य चळवळीत त्यांनी योगदान दिलं आहे.

छावणी हलते आहे, ही बांधावरची माणसं, नवा अजेंडा : आंबेडकरी चळवळीचा, झिलकरी चळवळीचे, दलित विद्रोह, मैदानातील माणसे, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. त्यांना लालजी पेंडसे समाजवादी विचारवंत पुरस्कार, तसंच कला अय्यंगार पुरस्कार मिळाला आहे. 

(अर्जुन डांगळे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link