Next
‘ट्रूबिल’चा ‘युनोकॉइन’शी सहयोग
प्रेस रिलीज
Friday, March 16, 2018 | 05:46 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘ट्रूबिल’ या पूर्व-मालकीच्या कार्सच्या‍ खरेदी-विक्रीसाठी असलेल्या देशाच्या आघाडीच्या ओम्नी-चॅनेल मंचाने देशातील सर्वात मोठे क्रिप्टो असेट वॉलेट युनोकॉइनसोबत सहयोग जोडला आहे. यासह ट्रूबिल जगातील सर्वात मोठे क्रिप्टो असेट ‘बिटकॉइन’मध्ये कार खरेदी व्यवहारांची सुविधा देणारी ही युज्ड ऑटोमोबाइल क्षेत्रातील भारताची आघाडीची संघटित कंपनी बनली आहे.

‘ट्रूबिल युनोकॉइन’च्या‍ पीओएस अॅप्लिकेशनचा वापर करत त्यांच्या ‘ब्रिक अँड मोर्टार स्टोअर्स’मध्ये बिटकॉइन पेमेंट्स स्वीकारेल. दोन विभागांमधील या प्रमुख कंपन्यांच्या सहयोगाने भारतात असलेल्या जगातील पहिल्या विकेंद्रीकृत डिजिटल असेटमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणतील आणि देशातील त्यांचे संबंधित व्यवहार व मान्यता वाढवतील.

‘ट्रूबिल’चे सहसंस्थापक व विपणन प्रमुख शुभ बन्स‍ल म्हणाले, ‘अधिकाधिक व्यवसाय पर्यायी पेमेंट सुविधा म्ह‍णून ‘क्रिप्टो असेट’चा अवलंब करत असताना आमच्यासारख्या भारतीय तंत्रज्ञान-संचालित कंपन्यांनी गतिशील राहून या वाढत्या असेटचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त पेमेंट म्हणून बीटकॉइनचा स्वीकार करत आम्ही विनाशुल्क किंवा फसवणूक होण्याच्या शक्यतेशिवाय आणि त्वरित पेमेंट सुविधेसह कमी व्यवहार शुल्कांचा लाभ देण्या‍मध्ये सक्षम होऊ. एखादी व्यक्ती मिळालेले बीटकॉइन्स सहजपणे भारतीय चलनामध्ये बदलू शकते. बिटकॉइनमधील व्यवहार करताना कोणत्याही उत्पादनाच्या किंमतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता नसल्याने कार खरेदीदार कारच्या दिलेल्या किमतीनुसार पेमेंट करून कार खरेदी करू शकतील.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link