Next
‘महिंद्रा’तर्फे ‘महिंद्रा रुरल भारत अँड कन्झमशन’ योजना
प्रेस रिलीज
Monday, October 08, 2018 | 03:56 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महिंद्रा म्युच्युअल फंड या महिंद्रा अँड महिंद्रा फिनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडच्या (एमआयएमएफएसएल) उपकंपनीने ग्रामीण भारतातील इन्कम व कन्झमशनमध्ये सहभागी असणाऱ्या किंवा या क्षेत्रांच्या प्रगतीमुळे फायदा होण्याची अपेक्षा असणाऱ्या प्रामुख्याने इक्विटी व इक्विटीशी संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकाळामध्ये भांडवलवृद्धी होण्याची अपेक्षा असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ‘महिंद्रा रुरल भारत अँड कन्झमशन योजना’ ही नवी ओपन-एंडेड इक्विटी स्कीम दाखल केली आहे.

याबाबत महिंद्रा म्युच्युअल फंडाचे सीएमओ जतिंदर पाल सिंग म्हणाले, ‘ही योजना ग्रामीण भारतातील रचनात्मक बदल व प्रगती यामध्ये सहभागी असलेले व यामुळे फायदा होण्याची अपेक्षा असलेले व्यवसाय व एंटिटी यामध्ये गुंतवणूक करून भांडवलवृद्धी करण्याचा प्रयत्न करणार आहे. ग्रामीण भारतातील इन्कम व कन्झमशन यामध्ये झालेल्या वाढीमुळे अनेक क्षेत्रांना सातत्याने लाभ होण्याची शक्यता आहे. सॉइल कार्ड, पीक विमा, अधिक एमएसपी, ई-मंडी व शेती उत्पन्न दुप्पट होणे, असा रचनात्मक सुधारणांमुळे ग्रामीण भागातील विनीयोग्य उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.’

न्यू फंड ऑफर १९ ऑक्टोबर २०१८ रोजी खुली होणार आहे व दोन नोव्हेंबर २०१८ रोजी बंद होणार आहे. सातत्यपूर्ण विक्री व पुनःखरेदी यासाठी ही योजना अलॉटमेंटच्या तारखेपासून पाच कामाच्या दिवसांमध्ये पुन्हा खुली होईल.

आशुतोष बिश्नोईमहिंद्रा म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष बिश्नोई म्हणाले, ‘लोकसंख्येच्या विविध घटकांचे सकारात्मक योगदान व ग्रामीण भागातील कन्झशनमध्ये वाढ यामुळे भारताच्या जीडीपीला हातभार लागेल, अशी अपेक्षा आहे. ‘महिंद्रा रुरल भारत अँड कन्झमशन योजना’ गुंतवणूकदारांना सक्षम व प्रसिद्ध कंपन्यांच्या वैविध्यपूर्ण इक्विटी पोर्टफोलिओ गुंतवणूक करून, त्यांना भारताच्या प्रगतीमध्ये व प्रामुख्याने ग्रामीण भागाच्या भरभराटीत योगदान देण्याची संधी देते. ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीची आकर्षक संधी देणार आहे. त्यामुळे गुंतवणुकीतून लक्षणीय भांडवलवृद्धी अपेक्षित असलेल्या गुंतवणूकदारांनी महिंद्रा रुरल भारत योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करावा.’

चीफ इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट व्यंकटरामन बालसुब्रमण्यम म्हणाले, ‘महिंद्रा म्युच्युअल फंड महिंद्रा रुरल भारत अँड कन्झमशन योजना देशाच्या वाढत्या जीडीपीमध्ये लक्षणीय योगदान देण्याची क्षमता असलेल्या श्रेणींमध्ये गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदारांना देणार आहे. चलनातील चढ-उतार अशा जागतिक तेजी-मंदीपासून सुरक्षित असलेल्या श्रेणींवर हा फंड लक्ष केंद्रित करणार आहे आणि ग्रामीण भारतात उपलब्ध असलेल्या संधींचा लाभ घेणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार आहे.’

ही योजना किमान ८० टक्के रक्कम ग्रामीण भागाशी संबंध असणाऱ्या एंटिटींच्या इक्विटी व इक्विटीशी संबंधित साधनांमध्ये करणार आहेत आणि २० टक्के रक्कम ग्रामीण भागाशी संबंध नसणाऱ्या एंटिटींच्या इक्विटी व इक्विटीशी संबंधित साधनांमध्ये करणार आहेत. ही योजना २० टक्क्यांपर्यंत रक्कम डेट व मनी मार्केट सिक्युरिटीजमध्ये व १० टक्क्यांपर्यंत रक्कम REITs व InvITs यांनी जारी केलेल्या युनिटमध्ये करणार आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search