Next
पुण्यात ‘स्टार्टअप ५के रनवॉक’चे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, February 28, 2018 | 02:56 PM
15 0 0
Share this article:

पुणे : टाटा टेलि बिझनेस सर्व्हिसेस (टीटीबएस) ही भारतातील उद्योगांना कनेक्टिव्हिटी आणि संपर्क क्षेत्रातील उपाययोजना पुरविणारी अग्रणी कंपनी व स्टार्टअप लीडरशिप प्रोग्राम (एसएलपी) यांनी बालिकांच्या शिक्षण व आरोग्यसेवांना प्रोत्साहन देण्यासाठी नुकतेच पुण्यामध्ये ‘स्टार्टअप ५के रनवॉक’चे यशस्वी आयोजन केले.

या उपक्रमांतर्गत खराडी आयटी पार्क ते वर्ल्ड ट्रेड सेंटर व पुन्हा खराडी आयटी पार्क असे पाच किलोमीटर अंतर धावून, चालून पूर्ण करण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. या उपक्रमाच्या हेतूला पाठिंबा देण्यासाठी स्टार्टअप क्षेत्रातील व्यक्ती तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने यामध्ये भाग घेतला. या उपक्रमातून उभारला गेलेला निधी बालिकांच्या सक्षमीकरणासाठी वापरला जाणार आहे.

या स्पर्धेमध्ये जोतीराम कौलागे, संग्राम देशमुख आणि सेल्वाराज नायडू यांनी अनुक्रमे पहिल्या तीन बक्षिसांवर आपले नाव कोरले. विजेत्यांना ‘टीटीबीएस’च्या पश्चिम प्रांताचे एसएमई ऑपरेशन्स विभागप्रमुख मन्नू सिंग यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना मन्नू सिंग म्हणाले, ‘५के रनवॉक हा लैंगिक समानतेबद्दल समाजाला जागरुक करण्यासाठीचा एक चांगला उपक्रम आहे. पुणेकर आणि विशेषत: स्टार्टअप क्षेत्रातील व विद्यार्थी गटांतील मंडळींनी या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने भाग घेतला व हा उपक्रम यशस्वी केला या गोष्टीचा मला आनंद आहे.’

या उपक्रमाबद्दल बोलताना ‘एसएलपी’च्या प्रोग्राम लीडर डॉ. रेश्मा सागरी म्हणाल्या, ‘मुलींच्या शिक्षण व आरोग्याचे प्रश्न सोडविण्याच्या कामी आपले पाठबळ देण्याच्या बाबतीत स्टार्टअप क्षेत्रामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘टीटीबीएस’च्या सहयोगाने या उपक्रमाचे आयोजन करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. यापुढेही भरपूर काम करून समाजामध्ये दूरगामी बदल घडवून आणण्याची आमची आकांक्षा आहे.’

हा ‘रन-फॉर-अ-कॉज’ उपक्रम सर्वांसाठी खुला होता व प्रामुख्याने नाविन्यपूर्ण संकल्पनांचे रचनाकार नव्या कंपन्यांचे संस्थापक, व्हीसी, व्यावसायिक आदी स्टार्टअप परिसंस्थेतील विविध सदस्यांना अनुलक्षून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्वयंचलित बाइकवॉश क्षेत्रातील स्टार्टअप कंपनी माय बाइक वॉश, क्रीडापटूंना सर्वोत्तम कामगिरीसाठी सिद्ध होण्यास मदत करणारी क्रीडा तंत्रज्ञान कंपनी स्पारअप, भावभावनांना इमोशन फेल्ट छायाचित्रे काढणारी पिक अ शूट, अंतर्गत सजावटीच्या क्षेत्रातील टेक स्टार्टअप कंपनी, कलर युअर ब्लॅंक स्पेसेस आणि नैसर्गिक, घरगुती होमिओपॅथिक आरोग्य आणि सौंदर्य उत्पादने बनविणारी रिडा वेलनेस अशा काही स्टार्टअप कंपन्या यात झाल्या होत्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search