Next
‘पीबीएमए’च्या टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रम
प्रेस रिलीज
Monday, July 02, 2018 | 12:18 PM
15 0 0
Share this story

पुणे : दृष्टिहीन व्यक्तींच्या कल्याणासाठी १९५२पासून काम करणार्‍या द पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन (पीबीएमए) या सामाजिक संस्थेच्या टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे (टीटीआय) डॉ. हेलन केलर यांची जयंती नुकतीच साजरी केली. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागांमधून आलेल्या सुमारे ३००हून अधिक दृष्टिहीन विद्यार्थ्यांना असिस्टिव्ह डिव्हाइसेसचे (स्मार्टफोन्स व प्लेक्स टोक) वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास राज्याचे अपंग कल्याण आयुक्त, रुचेश जयवंशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना असिस्टिव्ह डिव्हाइसेसचे वाटप करण्यात आले. या वेळी ‘पीबीएमए’चे अध्यक्ष परवेझ बिलिमोरिया, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कापसे, ‘टीटीआय’चे मानद संचालक जे. पी. ब्यानर्जी हे उपस्थित होते. ‘टीटीआय’मध्ये चालवल्या जाणार्‍या बहुविकलांग मुलांसाठी असलेल्या स्पर्श-डेफ ब्लाइंड केंद्राच्या छोट्या मुलांनी पालकांसोबत नृत्य सादर केले त्यांना कर्णबधीर मुलींनी साथ दिली. त्यानंतर दृष्टिहीन विद्यार्थ्यांनी गाणे सादर केले.

असिस्टिव्ह डिव्हाइस योजना ही केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत असून, सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हिज्युअली हँडीकॅप्ड यांच्या सहयोगाने राबविली जाते. या योजनेच्या लाभार्थी नोंदणीसाठी पुण्यात रामटेकडी, हडपसर येथील ‘पीबीएमए’चे टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्यवर्ती केंद्र असून, महाराष्ट्रभरातील विद्यार्थी येथे येऊन या उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली जाते. नोंदणी झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हिज्युअली हँडीकॅप्डतर्फे केली जाते आणि त्यानंतर असिस्टिव्ह डिव्हाइसेसचे वितरण होते.

अनेक दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना या असिस्टिव्ह डिव्हाइसेसचा अतिशय उपयोग झाला आहे. सन २०१४पासून आतापर्यंत स्मार्टकेन, सीडी प्लेयर्स व रेकॉर्डिंग डिव्हाइसेस यांसारखी सुमारे ५० लाख रुपये किंमतीची उपकरणे केंद्र सरकारच्या या असिस्टिव्ह डिव्हाइसेस फॉर इम्पेअर्ड पर्ससन्स (एडीआयपी) योजनेअंतर्गत दृष्टिहीन विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आली आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link