Next
गौरव कांकरिया ‘आयइए २०१९’ पुरस्काराने सन्मानित
BOI
Monday, March 25, 2019 | 03:20 PM
15 0 0
Share this article:

अभिनेत्री करिना कपूरच्या हस्ते ‘आयइए २०१९’ पुरस्कार स्वीकारताना गौरव कांकरिया.

पुणे : जागतिक स्तरावर कार्यरत असणाऱ्या भारतीय नागरिकास दिला जाणारा यंदाचा ‘आयइए २०१९’ पुरस्कार पुणे स्थित इंटेरिअर डिझाइनर गौरव कांकारिया यांना प्रदान करण्यात आला आहे. मलेशियात नुकत्याच झालेल्या पुरस्कार  वितरण समारंभात अभिनेत्री करीना कपूर खान हिच्या हस्ते कांकरिया यांना ‘इंटरनॅशनल एक्सलन्स अॅवॉर्ड इन इंटेरिअर डिझाइन’ (लक्झरी लाइफस्टाइल श्रेणी) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

गौरव कांकारिया यांना मॉरफिम बेंच (कोरिया), मोनोरेल स्टेशन, एज चेअर (सिंगापूर) यासह भारतात केलेल्या विविध सोशल, हेल्थकेअर, कमर्शिअल, लक्झरी रेसिडेन्शिअल आणि सेलिब्रेटी रेसिडेन्शिअल क्षेत्रात केलेल्या डिझाइनिंगकरिता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

कांकरिया हे २०१० पासून इंटेरिअर डिझाइन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी रॅफल्स डिझाइन इन्स्टिट्यूट (सिंगापूर), रचना संसद स्कूल ऑफ इंटेरिअर डिझाइन (मुंबई), मराठवाडा मित्र मंडळ स्कूल ऑफ इंटिरिअर डिझाइनमधून इंटेरिअर डिझाइनिंगचे शिक्षण घेतले. २०१० मध्ये अहमदनगर येथे ‘युटोपिया बाय गौरव कांकारिया’ या इंटेरिअर डिझाइन स्टुडिओची स्थापना केली. २०१२ मध्ये पुणे येथे दुसरी शाखा सुरू केली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search