Next
फलोदे गावात पिण्याच्या पाण्याच्या तळ्याचे उद्घाटन
BOI
Thursday, August 22, 2019 | 04:33 PM
15 0 0
Share this article:



आंबेगाव :
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील फलोदे या गावातील नंदेची वस्ती येथील तळ्याचे मे महिन्यात खोलीकरण करण्यात आले होते. रोटरी क्लब मेट्रो-पुणे आणि ग्रामपंचायत फलोदे-सावरली यांनी हा उपक्रम राबविला होता. हे तळे आता पावसामुळे पूर्ण भरून गेले आहे. या तळ्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.



उद्घाटनप्रसंगी ‘रोटरी क्लब मेट्रो’चे अध्यक्ष मुकुंद चिपळूणकर, सुनील गोखले यांच्यासह इतर पदाधिकारी, तसेच फलोदे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मनोहर मेमाणे, माजी सरपंच अशोक पेकारी, गणपत मेमाणे, काम करणारे ठेकेदार अमोल बेंगडे आदी उपस्थित होते. ग्रामस्थ आणि ‘रोटरी क्लब मेट्रो’च्या सदस्यांही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. या तळ्यामुळे नंदेची वस्ती येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची अपेक्षा गावकऱ्यांना आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search