Next
‘रोटरी’तर्फे अवयवदानाबाबत ऑनलाइन प्रतिज्ञा मोहीम
प्रेस रिलीज
Monday, August 06, 2018 | 04:56 PM
15 0 0
Share this story

पत्रकार परिषदेत माहिती देताना सह्याद्री हॉस्पिटल्सचे युनिट प्रमुख डॉ. केतन आपटे, गिफ्ट लाइफ उपक्रमाच्या समन्वयक रोटेरियन अमृता देवगांवकर, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१चे प्रांतपाल रोटेरियन शैलेश पालेकर आणि सचिव मंजू फडके.पुणे : रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ यांच्यातर्फे अवयवदानाबाबत व्यापक प्रमाणावर जागरूकता अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांना नऊ ऑगस्ट २०१८ रोजी ‘रोटरी’च्या वेबसाइटवर लॉगइन (वेबसाइट बातमीच्या शेवटी दिली आहे) करून अवयवदानासाठी प्रतिज्ञा करता येणार आहे.

या उपक्रमाला सह्याद्री हॉस्पिटल्ससह विविध संस्थांचे सहकार्य लाभले आहे. ही माहिती रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ चे प्रांतपाल रोटेरियन शैलेश पालेकर, गिफ्ट लाइफ उपक्रमाच्या समन्वयक रोटेरियन अमृता देवगांवकर, सह्याद्री हॉस्पिटल्सचे युनिट प्रमुख डॉ. केतन आपटे आणि रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ च्या सचिव मंजू फडके यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुण्यात विविध ठिकाणी ४० केंद्रांमध्ये ऑनलाइन नोंदणीसाठी सोय करून देण्यात आली आहे. त्यामध्ये विविध कंपन्या, शैक्षणिक संस्था व हॉस्पिटल्सचा समावेश आहे.

याप्रसंगी बोलताना रोटेरियन पालेकर म्हणाले, ‘रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ तर्फे नेहमीच समाजावर सकारात्मक प्रभाव पडेल असे विविध सामाजिक प्रकल्प व्यापक प्रमाणावर राबवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. गिफ्ट लाइफ उपक्रमाद्वारे आम्ही नागरिकांना अवयवदानाबाबत प्रतिज्ञा करून सहभागी व्हावे हे आवाहन करीत आहोत.’

रोटरी क्लब गांधीभवनच्या अध्यक्ष व या उपक्रमाच्या समन्वयक अमृता देवगांवकर म्हणाल्या, ‘या उपक्रमामध्ये आठ तासांत जास्तीत जास्त ऑनलाइन प्रतिज्ञा मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून, याद्वारे गिनिज रेकॉर्डमध्ये याची नोंद व्हावी यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील आहोत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश  अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि अवयवदाते व गरजू रुग्ण यांच्या संख्येतील दरी भरून काढणे आहे.’

अवयवदानाची प्रतिज्ञा करण्यासाठी : www.giftlife.co.in
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link