Next
पुणे येथे ‘संगीत सम्राट पर्व दोन’ची ऑडिशन
प्रेस रिलीज
Friday, May 11, 2018 | 04:06 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘झी युवा’ या वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेल्या ‘संगीत सम्राट’ कार्यक्रमाचे दुसरे पर्व सुरू होत आहे. ‘संगीत सम्राट पर्व दोन’च्या ऑडिशन नाशिक, नागपूर, पुणे, औरंगाबाद  कोल्हापूर आणि मुंबई या शहरांत होणार आहेत. १३ मे रोजी ‘संगीत सम्राट पर्व दोन’चे ऑडिशन पुणे शहरात सकाळी आठ वाजता ज्ञानसागर इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी आणि रिसर्च, एसकेपी कँपस, बाणेर-बालेवाडी रोड, पुणे महाराष्ट्र ४११०४५ येथे होणार आहे.

महाराष्ट्रातील अनेक होतकरू गायक आणि संगीतकार त्यांना मिळणाऱ्या प्रत्येक संधीच सोने करण्याची वाट पाहत असतात; मात्र अशा संधी फार कमी येतात. महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी ‘संगीत सम्राट’ या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील संगीत आणि गायकी क्षेत्रातील कलाकारांना एक वेगळा दर्जा मिळाला. गाण्यांवर आधारित रिअॅलिटी शोच्या या गर्दीत ‘संगीत सम्राट’ या आगळ्या वेगळ्या म्युजिकरिऍलिटी कार्यक्रमाने स्वतःची एक वेगळी ओळख बनवली आहे.

नव्या स्वरूपातील ‘संगीत सम्राट पर्व दोन’ एका वेगळ्या स्तरावर सुरू होणार आहे. या पर्वामध्ये संगीतमय माणसाचा शोध आणि माणसातील संगीताचा शोध घेतला जाणार आहे; पण एका नव्या आणि वेगळ्या पद्धतीने. या कार्यक्रमात केवळ गाणे गायचे नाही, तर ‘संगीत सम्राट’ हा कार्यक्रम अशा कलाकारांसाठी आहे जे कोणत्याही वाद्यापासून वस्तूपासून सुमधुर संगीत बनवू शकतील. तमाम मराठी प्रेक्षकांना स्वतःत असलेले संगीतगुण जगासमोर आणण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे.

ऑडिशनविषयी
दिवस :
रविवार, १३ मे २०१८
वेळ : सकाळी आठ वाजता
स्थळ : ज्ञानसागर इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी आणि रिसर्च, एसकेपी कँपस, बाणेर-बालेवाडी रोड, पुणे- ४११ ०४५.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link