Next
‘पेनिन्सुला लँड’चा परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात प्रवेश
प्रेस रिलीज
Friday, April 06, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this story

‘पेनिन्सुला लँड लिमिटेड’च्या ‘अॅड्रेसवन’ या परवडणाऱ्या घरांचा प्रकल्पाच्या घोषणेप्रसंगी   कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव पिरामल, अॅनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टंट्सचे अध्यक्ष अनुज पुरी व ‘पेनिन्सुला’चे संचालक नंदन पिरामल

पुणे : अशोक पिरामल समूहाचा भाग असलेल्या ‘पेनिन्सुला लँड लिमिटेड’ या आघाडीच्या कॉर्पोरेट रिअल इस्टेट विकसक कंपनीतर्फे पुण्यातील गहुंजे येथे ‘अॅड्रेसवन’ हा परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प दाखल केला आहे. या प्रकल्पाद्वारे कंपनीने परवडणाऱ्या घरांच्या श्रेणीमध्ये प्रवेश केला आहे’, अशी माहिती पेनिन्सुला लँड लि.चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव पिरामल यांनी दिली.

 ‘अॅड्रेसवन प्रकल्प ५० एकरांमध्ये विस्तारलेला असून  मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर पुण्याच्या बाजूला, एमसीए क्रिकेट स्टेडियमच्या बाजूला, मोक्याच्या ठिकाणी आहे. हिंजवडीशी सहजपणे जोडले जाणारे हे ठिकाण असून हिंजवडीपासून दहा किमीपेक्षाही कमी अंतरावर आहे. आलिशान आणि परवडणारे अशी दोन्ही वैशिष्ट्ये असलेले घर उपलब्ध करून, संभाव्य घर ग्राहकांना ‘लक्झरी फॉर ऑल’ घरे देण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात, कंपनी अंदाजे एक हजार  युनिट उपलब्ध करणार असून त्यामध्ये चार मजल्यांच्या एकावन्न इमारतींचा समावेश असेल व प्रत्येक मजल्यावर फक्त चार अपार्टमेंट असतील. पेनिन्सुला लँडचा हा पुण्यातील पहिला परवडणारा लक्झरी प्रकल्प आहे. त्यापूर्वी कंपनीने हिंजवडी येथे अशोक मिडोज हा अत्यंत यशस्वी प्रकल्प पूर्ण केला. हा प्रकल्प नामवंत आर्किटेक्ट हाफीझ काँट्रॅक्टर यांनी आखला आहे व त्यास पीएमएवायची (प्रधान मंत्री आवास योजना) मंजुरी मिळाली आहे’, असे ही पिरामल यांनी सांगितले.  

‘पेनिन्सुला लँड लि.ने भागीदार म्हणून अॅनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टंट्सची निवड केली आहे. लक्झरी घरांच्या क्षेत्रातील आमचा दीर्घ अनुभव व कौशल्य परवडणाऱ्या घरांसाठी वापरण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. त्यामुळे अॅड्रेसवन प्रकल्पाची घोषणा करणे ही व्यक्तिशः माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. भारतातील रिअल इस्टेट क्षेत्राच्या दृष्टीने परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रामध्ये आज प्रचंड संधी असून या क्षेत्रासाठी सध्या कमालीची मागणी आहे. परवडणाऱ्या घरांच्या श्रेणीला चालना देण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. पेनिन्सुला लँड ‘हाउसिंग फॉर ऑल’ या तत्त्वावर भर देते आणि हेच तत्त्व ‘लक्झरी फॉर ऑल’ या विचारालाही लागू करण्यासाठी वाव असल्याचे कंपनीला वाटते.अॅड्रेसवनच्या निमित्ताने आम्ही ग्राहकांना अतिशय आलिशान घरे परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करणार आहोत’, असे ही त्यांनी स्पष्ट केले. 

या भागीदारीविषयी बोलताना, अॅनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टंट्स प्रा. लि.चे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले, ‘लक्झरी श्रेणीतील मैलाचे टप्पे ठरतील अशा प्रकल्पांसाठी गौरवल्या जाणाऱ्या पेनिन्सुला लँड या समूहाशी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. परवडणाऱ्या घरांच्या बाबतीत लक्झरी घटकांचा समावेश करणाऱ्या या प्रकल्पाबाबत आम्ही विशेषतः उत्सुक आहोत. परवडणारे दर असलेल्या ‘लक्झरी फॉर ऑल’ घरांसाठी असंख्य ग्राहक उत्सुक असल्याचे आम्ही सुरुवातीला केलेल्या संशोधनामध्ये आढळले आहे. पुण्यातील या परिसरामध्ये झपाट्याने विकसित होणाऱ्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे, येत्या काही वर्षांत दरांमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने गहुंजे येथे प्रचंड संधी आहे. तसेच, या घरांसाठी केवळ पुण्यातूनच नाही, तर मुंबईतून व महाराष्ट्राच्या अन्य भागांतूनही मोठी मागणी आहे. मुंबईपासून नजिक असल्याचा फायदा पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्राला झाला आहेच, शिवाय आयटी/आयटीईएस, उत्पादन व सेवा उद्योगांतील विविध घटकही या क्षेत्राला चालना देत आहेत. परंतु, शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेले बांधकाम व जागेची चणचण असलेल्या परिसरांमध्ये वेगाने वाढत असलेले दर यामुळे पायाभूत सुविधांमध्ये झपाट्याने वाढ होत असलेल्या गहुंजे यासारख्या परवडणाऱ्या भागांत निवासी घरांसाठी मागणी वाढते आहे. रिअल इस्टेट हा क्षेत्र दराच्या बाबतीत कमालीचे संवेदनशील आहे आणि परवडणाऱ्या घरांना सध्या सर्वोच्च मागणी आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link