Next
पुण्यात होणार ‘जीआयआयएस’चा पहिला स्मार्ट कॅम्पस
बेंगळुरू, नागपूर, मुंबई येथे स्मार्ट कॅम्पससाठी गुंतवणार ४२० कोटी रुपये
प्रेस रिलीज
Thursday, July 18, 2019 | 01:13 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : सिंगापूरमध्ये मुख्यालय असलेली ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (जीआयआयएस) भारतातील पहिला स्मार्ट कॅम्पस पुणे येथे होणार आहे. सिंगापूरमध्ये २०१८मध्ये सादर केलेली आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त स्मार्ट कॅम्पसची संकल्पना हडपसर आणि बालेवाडीत अंमलात आणली जाणार आहे. नव्या पिढीला २१व्या शतकातील कौशल्ये शिकवण्याच्या उद्दिष्टाने या कॅम्पसची स्थापना करण्यात येणार आहे.

‘जीआयआयएस’ भारतात अस्तित्वात असलेल्या कॅम्पसमध्ये समान अध्यापन तंत्र आणि उपक्रम राबवले जाणार असून, त्यासाठी येत्या काही वर्षांत ४२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या मध्ये स्मार्ट कॅम्पस अध्यापन तंत्रासह विद्यार्थ्यांना शिकवण्यातून मिळणारे निष्कर्ष उंचावण्यासाठी आणि त्यांना भविष्याच्या दृष्टीने तयार करण्यासाठी खास वैशिष्ट्ये वापरली जाणार आहेत. 

स्मार्ट कॅम्पसतर्फे जागतिक विद्यार्थी आदानप्रदानासाठी डिजिटल आणि व्हर्च्युअल वर्ग, विद्यार्थ्यांची उपस्थिती व कॅम्पसच्या सुरक्षेसाठी फेशियल रेकग्निशन, संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि औद्योजिकता स्टुडिओज अशा प्रकारच्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. विद्यार्थ्यांना नवी कौशल्ये आत्मसात करता यावीत आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हरित व शाश्वत शिक्षणाचे वातावरण उपलब्ध व्हावे यासाठी या सुविधा दिल्या जातात.

त्याचबरोबर भारतात पहिल्यांदाच ‘जीआयआयएस’च्या माध्यमातून शालेय स्तरावर क्रीडा विश्लेषण सुरू केले जाणार असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांची माहिती आणि सांख्यिकी माहितीद्वारे मैदानावरील कामगिरीवर देखरेख केली जाईल व ती उंचावण्यासाठी मदत केली जाईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर बास्केटबॉल आणि सॉकर या खेळांच्या संघांसाठी हे तंत्र वापरले जाते.

पुण्यात सुरू होणाऱ्या भारताच्या पहिल्या स्मार्ट कॅम्पसविषयी जीआयआयएसचे सह- संस्थापक आणि अध्यक्ष अतुल तैमुर्णीकर म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना जागतिक मंचावरील आपले भविष्य तयार करण्यासाठी स्मार्ट कॅम्पसवर नेक्स्टजेन लर्निंगची निर्मिती करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल बांधील आहे.’


विद्यार्थ्यांना २१व्या शतकातील कौशल्ये आत्मसात करता यावीत यासाठी ‘जीआयआयएस’तर्फे कौशल्यांवर आधारित स्टुडिओज सुरू करण्याचे ‘जीआयआयएस’चे नियोजन असून, त्यात डिजिटल डिझाइन, रेडिओ आणि टीव्ही स्टुडिओ, मेकर स्पेसेस, किंग आणि इतरही बऱ्याच स्टुडिओजचा समावेश असेल व त्यामागे भविष्यातील तंत्रज्ञानाविषयीचे ज्ञान उंचावण्याचा हेतू असेल. शिक्षण आणि अनुभूती उंचावण्यासाठी काहींची खास निवड केली जाणार असून, त्यात दृकश्राव्य यंत्रणा, विद्यार्थी व शिक्षकांसाठी स्मार्ट आयडी कार्ड्स, कॅशलेल पेमेंट यंत्रणा, स्मार्ट टॉयलेट्स, मोशन सेन्सर्स आदींचा समावेश असेल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search