Next
शिर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
प्रेस रिलीज
Wednesday, August 01, 2018 | 03:24 PM
15 0 0
Share this article:

शिर्डी : येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, यांच्या वतीने २६ जुलैपासून सुरू असलेल्‍या गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता हभप चारुदत्‍त आफळे यांच्‍या काल्याच्या कीर्तनाने झाली.

३० जुलै रोजी उत्‍सवाच्‍या सांगता दिनी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल व प्रखर अग्रवाल यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा केली. उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम व त्‍यांची सुविद्य पत्‍नी मनाली निकम यांनी गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा केली. सकाळी १०.३० वाजता काल्याच्‍या कीर्तनानंतर दहिहंडी फोडण्‍यात आली.

या वेळी संस्‍थानचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली. सायंकाळी धुपारतीनंतर ७.३० ते नऊ यावेळेत शिर्डी येथील सुधांशु लोकेगांवकर यांचा, नऊ ते ९.४५ रायपूर येथील अंचल शर्मा यांचा, तर ९.४५ ते अकरा या वेळेत रायपूर येथील मदन चौहान यांचा साई भजनाचा कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपात झाला. या कार्यक्रमांना श्रोत्‍यांनी उत्‍स्‍फूर्त दाद दिली.

हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी अग्रवाल व विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे, पोलिस उपअधिक्षक आनंद भोईटे, सर्वप्रशासकीय अधिकारी, सर्व विभागप्रमुख व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Datta Bhosale ropale About
zan
0
0

Select Language
Share Link
 
Search