Next
प्रसन्न पटवर्धन यांना पुरस्कार
प्रेस रिलीज
Friday, July 20 | 04:37 PM
15 0 0
Share this story

प्रसन्न पटवर्धन
पुणे : प्रवासी वाहतुक क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक, ‘प्रसन्न पर्पल’ या वाहतुक सेवा पुरवणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि ‘बस ऑपरेटर कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया’चे (बीओसीआय) अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन यांना ‘इंडिया बस अॅवॉर्डस २०१८’ या अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात ‘बेस्ट लीडरशिप अॅवॉर्ड’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.    

मलेशियामध्ये क्वालालंपूर येथे नुकत्याच झालेल्या सोहळ्यात ‘टूरिझम मलेशिया’चे महासंचालक दातुक सेरी मिर्झा तायाबा यांच्या हस्ते पटवर्धन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारांचे हे चौथे वर्ष आहे. पटवर्धन यांच्या ‘प्रसन्न पर्पल’ या प्रवासी वाहतुक संस्थेलाही या सोहळ्यात तब्बल पाच पुरस्कार मिळाले आहेत. पश्चिम भारतातील सर्वोत्कृष्ट बस सेवा, उत्कृष्ट विपणन, तंत्रज्ञानाचा उत्तम वापर आणि उत्कृष्ट बस सुरक्षितता सुविधा यासाठी संस्थेस हे पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे यंदा सलग चौथ्या वर्षी संस्थेस ‘बेस्ट बस ऑपरेटर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

प्रसन्न पर्पल ही प्रवासी वाहतुक क्षेत्रातील तीस वर्षे जुनी संस्था असून, संस्थेत चार हजारांहून अधिक मनुष्यबळ आहे. देशभर संस्थेची एक हजार तीनशे वाहने सेवा पुरवतात. शहर वाहतुक, इंटरसिटी वाहतुक, कर्मचारी वाहतुक, शाळा वाहतुक, ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ पद्धतीची प्रवासी वाहतुक, लहान पल्ल्याची लक्झरी बस सेवा, देशांतर्गत व देशाबाहेरील पर्यटन सेवांमध्ये संस्था कार्यरत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link