Next
शासनाच्या पत्रकारिता पुरस्कार प्रवेशिकेसाठी मुदतवाढ
१५ मार्चपर्यंत पाठवता येणार प्रवेशिका
BOI
Saturday, March 02, 2019 | 05:39 PM
15 0 0
Share this story

मुंबई : राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे पत्रकारिता क्षेत्रातील विविध पुरस्कारांसाठी प्रवेशिका पाठवण्यासाठीची मुदत वाढवण्यात आली आहे. २८ फेब्रुवारी या पूर्वनियोजित तारखेपर्यंत स्वीकारल्या जाणाऱ्या प्रवेशिका आता १५ मार्चपर्यंत पाठवता येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 
  
उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी एक जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी अशी ठरवण्यात आली होती. तथापि आता या प्रवेशिका पाठविण्यासाठी १५ मार्च २०१९पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे. स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय येथील कार्यालयातून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथेही उपलब्ध आहेत. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link