Next
रफींच्या बहारदार गीतांच्या मैफलीने श्रोते मंत्रमुग्ध
महक व म्युझिक इंडियातर्फे ‘माधुर्य मधुरता’ कार्यक्रमाचे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, December 26, 2018 | 05:51 PM
15 0 0
Share this story



पुणे : ‘दिल पुकारे आ रे आ रे...’, ‘पर्बत के इस पार...’ ‘गुलाबी आँखे...’, ‘छुप गये सारे नजारे...’, ‘बेखुदी में सनम...’, ‘निंदिया से जागी बहार...’, ‘पत्ता पत्ता बुटा बुटा...’,  ‘कोयल बोली दुनिया डोली...’ या आणि अशा बहारदार गीतांनी २१ डिसेंबरची सायंकाळ ‘रफीमय’ झाली. निमित्त होते ते मोहम्मद रफी यांच्या जन्मदिनानिमित्त महक व म्युझिक इंडिया यांच्यातर्फे आयोजित केलेल्या ‘माधुर्य मधुरता’ या युगुल गीतांच्या कार्यक्रमाचे.

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेली एकूण २४ गाणी या कार्यक्रमात सादर करण्यात आली. ही मैफल कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगली. प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल आणि गफार मोमीन यांनी आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर मोहिनी घातली.

संगीत संयोजन सईद खान यांनी केले. गोविंद कुडाळकर (तबला), राजन साळवी (ढोलक), सचिन वाघमारे (बासरी), सईद खान (सिंथेसायझर), असिफ खान इनामदार (ऑक्टोपॅड) यांनी साथसंगत केली. संदीप पंचवाटकर यांच्या अर्थपूर्ण निवेदनाने मैफलीत रंगत आणली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link