Next
‘डीएनएस’ बँकेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
BOI
Tuesday, March 12, 2019 | 10:58 AM
15 0 0
Share this article:रत्नागिरी : डोंबिवली नागरी सहकारी बँकेने (डीएनएस) रत्नागिरीतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला. महिला दिनाचे औचित्य साधून टीआरपीनजीक बँकेच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमात बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रकाश खाडिलकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक निशा जाधव, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापिका तथा राष्ट्रीय सेवा योजनेतील कार्यक्षम अधिकारी डॉ. सीमा कदम, प्रख्यात वकील व सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. प्रिया लोवलेकर, ग्रामपंचायत सदस्य साक्षी भोंगले, जागुष्टे हायस्कूलमधील शिक्षिका अर्चना जोशी यांचा सन्मान करण्यात आला; तसेच सत्कार टेक पॉइंटच्या सौ. राणे, आंबा बागायतदार मीरा दामले, श्रीमती पेजे, भाई वडापावच्या संचालिका पल्लवी शिंदे, डॉ. पल्लवी गद्रे, शिक्षिका नेत्रा राजेशिर्के, सौ. डोंगरे, संगीता माईण यांचाही सत्कार खाडिलकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविकामध्ये खाडिलकर यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. प्रारंभी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.या प्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक जाधव म्हणाल्या, ‘सायबर फ्रॉडचे प्रमाण महिलांच्याबाबतीत जास्त आहे. एटीएम कार्ड बंद आहे, नंबर सांगा, ओटीपी सांगा असे विचारल्यावर महिला बळी पडतात. ऑनलाइन कर्ज देतो, एवढे रुपये भरा असे सांगितल्यावरही महिला फसतात. बँकेतून असे फोन कधीही केले जात नाहीत. त्यामुळे सावध राहा. महिला दिन हा एक दिवस साजरा करायचा नसून ३६५ दिवस आपलेच आहेत. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात मला काम करण्याची संधी मिळाली. देशाच्या संरक्षणमंत्रीसुद्धा महिलाच आहेत. आपण महिला कशातही कमी नाही. सावित्रीबाई फुले यांची जयंतीही आपण मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजे.’या वेळी डॉ. कदम यांनी महिलांच्या अंगचे गुण सांगताना चारित्र्य जपणे ही महत्त्वाची गोष्ट असून, तसे संस्कार आपण मुलीवर केले पाहिजेत, असा सल्ला दिला. अ‍ॅड. लोवलेकर यांनीही महिला दिनाचे महत्त्व सांगितले. शिक्षिका जोशी यांनी बँकेने केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search