Next
‘दिवाळी अंकाचे पावित्र्य पुणेकरांनी टिकवले’
प्रेस रिलीज
Saturday, October 20, 2018 | 02:25 PM
15 0 0
Share this article:

पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना डॉ. सुरेश तलाठी, मुकुंद टांकसाळे, सुधीर गाडगीळ, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, डॉ. सतीश देसाई, बाळासाहेब अनास्कर, युवराज शहा.

पुणे : ‘दिवाळी अंकाचे पावित्र्य पुणेकरांनी टिकवले. पुणेरी संस्कार, घटना, इतिहास याची नोंद पुण्यभूषण दिवाळी  अंक घेतो, त्यामुळे हा अंक वैशिष्टयपूर्ण आहे,’ असे उद्गार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काढले.

‘तिरकस पुणेकरांनी सरळ पुणेकरांवर काढलेला दिवाळी अंक’ अशी ख्याती असलेल्या आठव्या पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन १९ ऑक्टोबर २०१८ रोजी माजी मुख्यमंत्री राणे, सहकारी बँकिंग तज्ञ बाळासाहेब उर्फ विद्याधर अनास्कर, अमेरिकास्थित पुणेकर डॉ. सुरेश तलाठी, ज्येष्ठ साहित्यिक मुकुंद टाकसाळे, सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी राणे बोलत होते. बीएमसीसी कॉलेजशेजारील महावीर जैन विद्यालय पटांगणात हा कार्यक्रम झाला.

सुरुवातीला विठ्ठल काटे, सुमन काटे, मकरंद टिल्लू यांनी हास्ययोग सादर केले. अप्पा कुलकर्णी यांनी शीळ वादन केले.
 
राणे म्हणाले, ‘राजकारणी माणसाला समोर माणसे लागतात. आज माणसे पावसामुळे व्यासपीठावर आहेत; पण कोणी घरी गेले नाही. पुण्यात ‘पुण्यभूषण’ला इतिहास आहे. दिवाळी अंकाचे पावित्र्य पुणेकरांनी टिकवले. पुणेरी संस्कार, घटना, इतिहास याची नोंद हा अंक घेतो, त्यामुळे हा अंक  वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याच-त्याच गोष्टींकडे पुणेकर ढुंकून पाहत नाही, म्हणून डॉ. सतीश देसाई यांनी सतत नवनव्या गोष्टी सुरू केल्या. ‘पुण्यभूषण’ने पुणेकरांच्या चांगल्या गोष्टी पुढे आणल्या आणि स्वतःला चांगले म्हटलेले पुणेकरांना आवडते. अनासकर यांनी खडतर परिस्थितीतून पुढे येऊन कर्तृत्व गाजवले. मैत्रीचे पावित्र्य राखणारा माणूस म्हणजे बाळासाहेब अनासकर असे मी मानतो. बाळासाहेब अनासकर हे चालते बोलते विद्यापीठ आहे.’

मुकुंद टांकसाळे यांनी पुणेरी वातावरणाचे नर्मविनोदी शैलीत किस्से सांगितले. विद्याधर अनासकर यांनी आयुष्यातील यशाचे श्रेय आईला दिले. या वेळी युवराज शहा यांनी घेतलेल्या राणे यांच्या मुलाखतीतून राजकीय फटकेबाजी उपस्थितांना अनुभवता आली.

पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले. मकरंद टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले. ‘पुण्यभूषण’च्या या वर्षीच्या अंकाचे पहिले पान बाळासाहेब उर्फ विद्याधर अनास्कर यांना समर्पित करण्यात आले आहे. पाच पुणेकरांना त्यांच्या कर्तत्वाबद्दल, योगदानाचा उल्लेख करून त्यांना ‘सन्मान’ पानावर स्थान देण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 144 Days ago
How many copiers were sold ?
0
0

Select Language
Share Link
 
Search