Next
‘आझम’च्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षणाला प्रारंभ
प्रेस रिलीज
Tuesday, April 24 | 10:55 AM
15 0 0
Share this story

उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेले विद्यार्थी.

पुणे :
आझम स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीतर्फे मुला-मुलींसाठी घेतल्या जाणाऱ्या १५ दिवसीय उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराला नुकताच प्रारंभ झाला.

या शिबिरात सहा ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थी प्रशिक्षण घेणार असून, हे शिबिर ३० एप्रिलपर्यंत आझम कॅंपसच्या मैदानावर सुरू राहणार असल्याची माहिती अ‍ॅकॅडमीचे संचालक गुलजार शेख यांनी दिली.

दानिश सय्यद, शबनम पीरजादे, मजीद सय्यद, खालिद बागबान, आतिक शेख, पल्लवी पिल्ले हे प्रशिक्षक शिबिरात प्रशिक्षण देत आहेत. या शिबिरात विद्यार्थ्यांना पोहणे, स्केटिंग, अश्वारोहण, क्रिकेट, अ‍ॅरोबिकस्, योगा, जिमनॅस्टिक, फूटबॉल याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे; तसेच या शिबिराचे प्रमुख आकर्षण फेन्सिंग आणि रायफल शूटिंग याचे प्रशिक्षण आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link