Next
‘राजेंद्र कृष्ण यांनी सर्व ‘मूड्स’ना गीतातून सजवले’
प्रेस रिलीज
Monday, June 11 | 03:10 PM
15 0 0
Share this story

रसिक मित्र मंडळातर्फे आयोजित‘एक कवी -एक भाषा’ मासिक व्याख्यानमालेत हिंदी भाषेच्या अभ्यासक प्रा. शलाका गोळे यांचा सत्कार करताना  मंडळाच्या विश्वस्त डॉ. शशिकला शिरगोपीकरपुणे : ‘हिंदी गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी जीवनातील सर्व भावभावना, ‘मूड्स’नुसार उत्कट गीतलेखन केले, त्यामुळे त्यांची गीते सजली आणि लोकप्रिय ठरली,’ असे उद्गार हिंदी भाषेच्या अभ्यासक प्रा. शलाका गोळे यांनी काढले.

रसिक मित्र मंडळातर्फे ‘एक कवी -एक भाषा’ या मासिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. हे व्याख्यान नुकतेच श्रमिक पत्रकार भवन येथे झाले. मंडळाचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला यांनी स्वागत केले. ‘एक कवी -एक भाषा’ व्याख्यानमालेचे हे ५६वे पुष्प होते. अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश कामत होते. मंडळाच्या विश्वस्त डॉ. शशिकला शिरगोपीकर या उपस्थित होत्या.

प्रा. गोळे म्हणाल्या, ‘राजेंद्र कृष्ण यांनी सर्व छटा असलेली गीते लिहिली, त्यात देशभक्तीपर गीतांचाही समावेश होता. ‘जहाँ डाल डाल पर सोने की चिडियाँ करती है बसेरा’, ‘सुनो सुनो बापूजी की अमर कहानी’ ही देशभक्तीपर गीते गाजली. ‘कौन आया मेरे मन के द्वारे’, ‘दो घडी वो पास आ बैठे, हम जमाने से दूर जा बैठे’ अशी हळूवार गीते, ‘इना मिना डिका’, ‘मेरे पिया रंगून’ यासारखी खेळकर गीतेही त्यांनी लिहिली; मात्र खेळकर शब्दांमुळे हिंदी गीतसाहित्याची उंची कमी केल्याचा आरोपही त्यांच्या वाट्याला आला.

‘२०१८ हे वर्ष राजेंद्र कृष्ण यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष असल्याने या महान गीतकाराच्या शब्दांना उजाळा दिला पाहिजे,’ असे डॉ. कामत म्हणाले. या व्याख्यानाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(राजेंद्र कृष्ण यांच्या गीतांचा आस्वाद घेणारे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘सुनहरे गीत’ सदरात प्रसिद्ध झालेले विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link