Next
‘विद्या भवन’मध्ये २८ जूनला गायन सतार सहवादन कार्यक्रम
प्रेस रिलीज
Tuesday, June 25, 2019 | 04:05 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत गायन सतार सहवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, २८ जून २०१९ रोजी ‘भारतीय विद्या भवन’च्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात सायंकाळी सहा वाजता होणार आहे,’ अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.

या कार्यक्रमात उस्ताद शाहिद परवेझ यांचे शिष्य सतारवादक समीप कुलकर्णी हे सतारवादन करणार असून, सौरभ काडगावकर गायन करणार आहेत. त्यांना तबल्यावर अरविंद परांजपे, हार्मोनियमवर सुखदा खरे साथसंगत करणार आहेत. स्नेहा रानडे या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा ७७वा कार्यक्रम असून, सर्वांसाठी खुला आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : शनिवार, २८ जून २०१९ 
वेळ : सायंकाळी सहा वाजता 
स्थळ : भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रोड, पुणे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search