Next
इलेक्ट्रिक वाहने होणार स्वस्त
इलेक्ट्रिक वाहनांच्या सुट्या भागांवरील सीमा शुल्कात कपात
BOI
Thursday, January 31, 2019 | 05:55 PM
15 0 0
Share this story


नवी दिल्ली : विजेवर चालणाऱ्या (इलेक्ट्रिक)वाहनांना प्रोत्साहन देण्याकरता केंद्रसरकारने मंगळवारी इलेक्ट्रिक वाहनांच्या सुट्या भागांवरील सीमा शुल्कात मोठी कपात केली. त्यामुळे आता इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होण्याची चिन्हे आहेत. 

संपूर्णपणे सुट्या भागांमध्ये किंवा अंशतः सुट्या भागांसह आयात करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहनांवरील सीमा शुल्क १५ ते ३० टक्क्यांवरून १० ते १५ टक्के करण्यात आले आहे. यामुळे विजेवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन मिळेल आणि यातून रोजगार निर्मिती व गुंतवणूकही वाढेल, अशी सरकारची अपेक्षा आहे.  

विजेवर चालणारी वाहने संपूर्ण सुट्या भागांच्या स्वरूपात किंवा अंशतः सुट्या भागात आयात केली जातात आणि भारतात त्याची जुळणी केली जाते. चासिसवर न बसवता बॅटरी पॅक, मोटर, ब्रेक सिस्टीम आणि अन्य सुटे भाग आयात करण्यात आले तर त्यांच्यावर १० टक्के शुल्क आकारण्यात येणार असून, अंशतः जुळणी केलेल्या स्वरूपात आयात वाहनावर १५ टक्के शुल्क आकारले जाईल, असे उत्पादन आणि सीमा शुल्क विभागाने एका निवेदनाद्वारे जाहीर केले आहे. 


संपूर्णपणे जुळणी केलेल्या विजेवरील वाहनांवर २५ टक्के आयात शुल्क आकारले जाते. पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर हे शुल्क १०० टक्के असते. इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी वाढावी या उद्देशाने त्यावर अनुदान देण्याचे सरकारचे धोरण आहे. त्याला पाठबळ देण्याच्या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे. पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे वायूप्रदूषण धोकादायक ठरत असून, दिल्लीमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यावर भर दिला आहे. त्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. ग्राहकांचा ओढा मात्र इलेक्ट्रिक वाहनांकडे कमी आहे, तर इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्या अनुदानासाठी आग्रही आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत या वाहनांचे भविष्य अधांतरी आहे. 

‘इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीवरील सीमा शुल्क कमी करण्याचा सरकारचा निर्णय हा ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने घेतला असल्याचे स्पष्ट दिसते. इलेक्ट्रिक वाहनांच्या सुट्या भागांवरील सीमा शुल्क कमी केल्याने भारतात त्यांच्या जुळणीला प्रोत्साहन मिळेल,’ असे ‘इवाय’ या सल्लागार संस्थेचे अभिषेक जैन यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link