Next
हिमायतनगरमध्ये संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी
नागेश शिंदे
Saturday, September 08 | 05:17 PM
15 0 0
Share this storyहिमायतनगर :
शहरात दर वर्षी प्रमाणे यंदाही श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी नाभिक समाजाच्या बांधवांनी साजरी केली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून हिमायतनगर शहराचे प्रथम नागरिक कुणाल राठोड, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष मो. जावेद भाई उपस्थित होते. नाभिक समाजाचे आराध्य दैवत असलेले संत सेना महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे भाषण अरविंद माने यांनी केले. नाभिक समाजाच्या समाज मंदिराच्या बांधकामासाठी नगर पंचायतीच्या माध्यमातून जागा देणार असल्याचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी या वेळी सांगितले. या वेळी अन्वर खान पठाण, सरदार खान पठाण, सदाशिव सातव, शिवसेना आणि अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष जफर लाला, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष राम भाऊ सूर्यवंशी, बंडूभाऊ अंनगुलवार, मंगेश धुमाळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

एकनाथराव कळसे, परमेश्वर शिंदे, गजानन चायल, गायकवाड सर, अरविंद माने, गवळी सर, सचिन सर, कोरेकलकर सर, कोंडामंगल सर, राजू सुरजवाड, पपू सोळंके, गणेश वागंबरे, नागेश शिंदे, अवधूत गायकवाड, नरस्या अन्ना गंधम, व्यंकटी गंधम, सोनू गायकवाड आदी समाजबांधव या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वडगावचे मुख्यध्यापक गायकवाड सर यांनी केले. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांनी आभार मानले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link