पुणे : यंदे मेडिकल फाउंडेशन व स्पेशालिटी डे केअर सेंटर यांच्या वतीने दत्तात्रय जयराम यंदे स्मृती आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर कोथरूड येथील स्पेशालिटी डे केअर सेंटर येथे ३० सप्टेंबर २०१८पर्यंत (सोमवार ते शनिवार) सकाळी ११.३० ते दुपारी २.३० या वेळेत सुरू असणार आहे.
या शिबिरामध्ये कान, नाक, घसा, नेत्र व दातांची तपासणी सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे. नाक, कान, घसा यांच्या दुर्बिणीतून तपासणीसाठी २०० रुपये, ऐकू येण्याच्या तपासणीसाठी १०० रुपये शुल्क आकारले जाईल. स्लीप स्टडी (घोरणार्यांसाठी) व अॅलर्जी टेस्टवर ५० टक्के सवलत, तसेच उपचारांवर सवलत मिळणार आहे. याशिवाय श्रवणयंत्रांवर किमान २५ टक्के सवलत दिली जाणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे.
शिबिराविषयी :
कालावधी : रविवार, ३० सप्टेंबर २०१८पर्यंत
वेळ : सकाळी ११.३० ते दुपारी २.३०
स्थळ : केअर सेंटर, हॅपी कॉलनी लेन थ्री, कोथरूड, पुणे.
शिबिरात सहभागी होण्यासाठी संपर्क : ९०११० ३६२८९/ ९७६३७ ९१७९८