Next
‘रस्ता सुरक्षा’विषयी शुभेच्छापत्रांचे वाटप
प्रेस रिलीज
Saturday, December 30 | 06:29 PM
15 0 0
Share this story

पुणे : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट (आयएमईडी) च्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभाग (एनएसएस) यांच्या वतीने रस्ता सुरक्षा जनजागृती, स्वच्छ भारत आणि ग्रीन इंडिया अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

या अभियानातंर्गत शहरातील विविध भागातील प्रमुख २० सिग्नलच्या ठिकाणी महाविद्यालयाच्या ४०० विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि वाहतूक सुरक्षाविषयी संदेश असलेल्या १७ हजार शुभेच्छापत्रांचे आणि पाच हजार चॉकलेटचे वाटप केले.

अभियानात भारती विद्यापीठ विश्‍वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर, एनएसएस विभागप्रमुख डॉ. भारतकुमार सांख्ये, डॉ विजय फाळके, एनएसएस विभागाचे समन्वयक प्रा. मैत्रे, ‘एमसीए’चे संचालक डॉ. ए. डी. मोरे, प्रा. एस. सी. हेमबाडे यांसह महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे विद्यार्थी आणि ‘आयएमईडी’मधील प्राध्यापक सहभागी झाले होते.

या अभियानातंर्गत वाटलेले ‘पॉकेट शुभेच्छापत्र’ चार पानी आहे. यामध्ये वाहतूक सुरक्षा याविषयी संदेश देण्यात आले आहेत; तसेच ‘ग्रीन इंडिया’ आणि ‘स्वच्छ भारत अभियान’ याविषयीच्या संदेशांचा यामध्ये समावेश आहे. नागरिकांनी या अभियानाला चांगला प्रतिसाद दिला.

‘रस्ते अपघातांची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे, या पार्श्‍वभूमीवर हे जनजागृतीपर अभियान राबविण्यात आले’, असे डॉ. वेर्णेकर यांनी या वेळी सांगितले.

हे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान शहरातील प्रमुख चौकांमध्येही आयोजित केले होते. यामध्ये कोथरूड डेपो, परिहार चौक (औंध), श्री दगडूशेठ गणपती, सारसबाग (महालक्ष्मी मंदिर), वारजे पूल, संतोष हॉल (आनंदनगर, सिंहगड रोड), महानगरपालिका (बालगंधर्व), बिग बाजार (हडपसर), कर्वे पुतळा (कोथरूड), कात्रज सिग्नल, गुडलक चौक, स्वारगेट, शिवाजीनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, बाणेर सिग्नल, अभिरूची मॉल (सिंहगड रोड), एमआयटी (आनंदनगर), राजाराम पूल, पद्मावती (सातारा रोड), नळ स्टॉप या चौकांचा समावेश होता.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link