Next
‘बजाज’तर्फे ‘डॉट नेक्स्ट’ची दुसरी आवृत्ती सादर
प्रेस रिलीज
Thursday, June 07, 2018 | 11:44 AM
15 0 0
Share this story

पुणे : पंखे, लाइटिंग आणि अभियांत्रिकी प्रकल्प या क्षेत्रांमध्ये देशात अग्रणी असलेल्या बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीने ‘डॉट नेक्स्ट अपग्रेड’ या संकल्पनेची दुसरी आवृत्ती ‘स्मार्ट इनडोअर्स अॅंड कनेक्टेड आउटडोअर्स’ या विषयाखाली पुण्यात सादर केली. हॉटेल कॉनरॅड येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रख्यात आर्किटेक्ट्स, कन्सल्टंट्स, स्पेसिफायर्स, विविध उद्योगांमधील वरिष्ठ अधिकारी, उच्च सरकारी अधिकारी, धोरणात्मक निर्णय घेणारे अधिकारी तसेच वितरक आदी उपस्थित होते.

देशातील शंभर स्मार्ट शहरांच्या यादीत पुण्याचा समावेश आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या पुण्यात आठहून अधिक नामवंत विद्यापीठे आहेत; तसेच वाहन उत्पादन, डिझाइन व ग्राहकोपयोगी वस्तू यांच्या दिग्गज कंपन्या पुण्यात व पुणे परिसरात आहेत. त्यामुळे पुणे हे वास्तव्य व व्यवसाय करण्यासाठीचे आदर्श शहर बनले आहे. शिक्षणाचे माहेरघर व आयटी कंपन्यांचे प्रमुख केंद्र अशी ओळख पुणे शहराची झाल्याने त्याचा भौगोलिक विस्तारही झाला आहे. शहराच्या चहुबाजूंना वेगवेगळ्या टाउनशिप्स उभ्या राहिल्या असून, त्यामुळे कनेक्टिव्हिटीची गरज अधिक प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर या सर्व परिसराचा स्मार्ट पद्धतीने होणे अनिवार्य झाले आहे. स्मार्ट लाइटिंग, इंटिग्रेटेड बिल्डिंग मॅनेजमेंट सोल्युशन्स (आयबीएमएस), तसेच अभियांत्रिकी व बांधकाम सेवा (इपीएस) यांची उपलब्धता वाढवून पुण्यातील नागरिकांना अत्याधुनिक सुविधा देणे हाच ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’तर्फे आयोजित ‘डॉट नेक्स्ट अपग्रेड’ या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. पुणेकरांना शाश्वत व आधुनिक विकासाची फळे मिळावीत यासाठी अत्याधुनिक अशा ‘डॉट नेक्स्ट आयओटी’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’ने ठरविले आहे.

नव्या शहरी विकासाची गरज लक्षात घेत ‘स्मार्ट सिटीज’, ‘स्मार्ट बिल्डिंग’, ‘ह्युमन सेंट्रिक लाइटिंग’, ‘स्पोर्ट्स लाइटिंग’, ‘आर्किटेक्चरल लाइटिंग’, फळ उद्योग, आरोग्य सेवा व अन्य उद्योगांना लागू पडेल, असे प्रभावी तंत्रज्ञान ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’ देत आहे. हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात, तसेच ‘क्लाउड कनेक्टिव्हिटी’, ‘वायरलेस सोल्युशन्स’ यांसारख्या ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’वरही वापरण्याजोगे आहे. या तंत्रज्ञानामुळे उत्पादकता वाढल्याचा आणि आरामदायी, सोप्या, सुलभ, स्मार्ट जीवनशैलीचा अनुभव ग्राहकांना घेता येणार आहे.

‘बजाज इलेक्ट्रिकल्स’चे उपाध्यक्ष व ‘इल्युमिनेशन इपीसी’ विभागाचे प्रमुख संजय भगत या कार्यक्रमात म्हणाले, ‘या वर्षी आम्ही आमचे सर्व लक्ष ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (आयओटी) तंत्रज्ञानावर चालणाऱ्या स्मार्ट उत्पादनांवर व ‘आयबीएमएस सोल्युशन्स’वर केंद्रीत केले आहे. ‘स्मार्ट आउटडोअर लाइटिंग’ या क्षेत्रात आम्ही अजूनही निर्विवाद नेते आहोत. आधुनिक कार्यालये, उद्योग, रिटेल स्टोअर आदी ठिकाणी लाइटिंग उभारण्याचा आम्हाला मोठा अनुभव आहे. उपलब्ध स्रोतांचा योग्य तो लाभ घेत सर्व क्षेत्रांना जागतिक दर्जाची उत्पादने व सेवा पुरविण्याची आमची परंपरा आम्ही यापुढेही कायम ठेऊ. स्मार्ट सिटी प्रकल्पात आमचा सहभाग हा सर्व स्तरांवर असणार आहे. अगदी सबस्टेशन उभारण्यापासून, वीज वितरण, लाइटिंग आणि विद्युत उपकरणे उपलब्ध करून देणे ही आमच्या कामाची व्याप्ती असणार आहे. हेच आमच्या व्यवसायाचे सूत्र आहे.’

‘बजाज इलेक्ट्रिकल्स’च्या या सादरीकरणाच्या कार्यक्रमास उद्योग क्षेत्रातील व सरकारी खात्यांमधील धोरण निर्मिती, उत्पादन, डिझाईन, प्रकल्प, लेखा परीक्षण आदी क्षेत्रांतील दिग्गजांची उपस्थिती होती. पुण्यातील मोठ्या कंपन्यांच्या गरजांनुरूप अशा ऊर्जा बचतीच्या शाश्वत अशा उपाययोजना ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’तर्फे दिवस-रात्र उपलब्ध करून दिल्या जातात.

केपजेमिनी, हनीवेल, आयटीसी, टाटा, हायर, एम्बसी इंडस्ट्री, इंडो स्पेस, कमिन्स, एमईएस, महानगरपालिका, नगर परिषदा आणि विविध सरकारी खाती या सर्वांना ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’तर्फे सेवा व उत्पादने पुरविली जातात. बजाज इलेक्ट्रिकल्स या समुहाचे पुणे परिसरात रांजणगाव व चाकण या दोन ठिकाणी कारखाने आहेत. तेथे हजारोजणांना रोजगार पुरविला जातो. पुण्यात लाइटिंग क्षेत्राच्या आपल्या व्यवसायात यंदा 30 टक्क्यांची वाढ होण्याची कंपनीला अपेक्षा आहे.

‘बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड’विषयी :
भारतात विश्वासार्ह नाव असलेल्या बजाज समूहातील बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही कंपनी आहे. जागतिक स्तरावरही ही कंपनी ग्राहकोपयोगी उत्पादने (उपकरणे, पंखे व लाइटिंग), प्रकाश दिवे, इपीसी (इल्युमिनेशन, विजेचे मनोरे व वीज वितरण), तसेच निर्यात या क्षेत्रात आपला दबदबा राखून आहे. देशाच्या विविध भागांत बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या २० शाखा आहेत. या शाखांना वितरक व विक्रेत्यांच्या मोठ्या साखळीचे सहकार्य होत असते. देशात सुमारे शंभर ठिकाणी बजाज वर्ल्ड या नावाने ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’ची स्वतंत्र शोरुम्स आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link