Next
‘मधुरिता’च्या तपपूर्ती महोत्सवाचा समारोप
BOI
Saturday, February 09, 2019 | 06:01 PM
15 0 0
Share this article:

मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या तपपूर्ती महोत्सवात नृत्य कलाकारांचा सत्कार करताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख.पुणे : मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या तीन दिवस चाललेल्या तपपूर्ती महोत्सवाचा समारोप शुक्रवारी, आठ फेब्रुवारी २०१९ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ नृत्यांगना मनीषा साठे, ‘शब्द परिवारा’चे प्रमुख संजय सिंगलवार, स्वागताध्यक्ष अॅड. शीतल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. 

या कार्यक्रमात युवा नृत्यांगनांचा सत्कार लक्ष्मीकांत देशमुख, मनीषा साठे, संजय सिंगलवार यांच्या हस्ते करण्यात आला.

‘नृत्य आणि गायनापुढे शब्द अपुरे पडतात. हीच नृत्य अभिव्यक्तीची ताकद आहे. नृत्य परंपरा महाराष्ट्रात पुढे नेण्यासाठी हे जे कार्य सुरू आहे, त्याला सर्वानी पाठिंबा द्यावा,’ असे गौरवोद्गार लक्ष्मीकांत देशमुख यांनी काढले. 

या वेळी ‘अभिनव’ अविष्कारांतर्गत एकल नृत्य सादर करण्यात आले. त्यात वल्लरी आपटे, सुजाता गावडे, दीक्षा त्रिपाठी, राजश्री घोंगडे, सिद्धी पोटे यांचे नृत्य झाले. नृत्यगुरू अर्चना संजय यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या कथक नृत्य रचनांना रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यांना तिन्ही दिवस चारुदत्त फडके (तबला), समी उल्लाह खान (हार्मोनियम आणि गायन), नितीश पुरोहित (सरोद), रश्मी मोघे (गायन ), तुषार घरत (पखवाज), संगीत मिश्रा (सारंगी) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी कुलकर्णी यांनी केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search