Next
‘सीए इन्स्टिट्यूट’तर्फे रत्नागिरीत दोन दिवसीय कार्यशाळा
BOI
Wednesday, June 26, 2019 | 11:53 AM
15 0 0
Share this article:

सीए इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित कार्यशाळेत बोलताना सीए प्रसाद आचरेकर.रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे ‘आयकर कायदा आणि जीएसटी कायदा यातील दंडाच्या तरतुदी’ या विषयावर शहरातील व्यंकटेश एक्झिक्युटिव्ह येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. यात सीए प्रसाद आचरेकर यांनी ‘जीएसटी कायद्यातील दंडाच्या व अटकेच्या तरतुदी’ या विषयावर सखोल विवेचन केले. 

‘जीएसटी कायद्यांतर्गत बिलाशिवाय विक्री करणे, विक्री न करता बिल देणे, चुकीचे कर परतावे मिळवणे व जमा केलेला कर सरकारला न भरणे यासाठी विक्रेत्याला अटक करण्याची तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने यासंदर्भात अटकेच्या तरतुदींचे पुनरावलोकन करण्यासाठी सध्या त्रिसदस्यीय खंडपीठाकडे हा विषय वर्ग केला आहे,’ असे आचरेकर यांनी सांगितले. 

सीए संजय वनभट्टे यांनी ‘आयकर कायद्यातील दंडात्मक कारवाईसंदर्भात जुन्या आणि नवीन तरतुदी’ यांविषयी सांगितले. उत्पन्न लपवणे, विवरणपत्र न भरणे या संदर्भात कायदेशीर कारवाईबाबत शंकांचे निरसन केले. या वेळी शाखेचे कार्यवाह सीए आनंद पंडित, सीए अभिजीत चव्हाण, सीए हेरंब पटवर्धन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सीए मोनाली कुलकर्णी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली. सीए अक्षय जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search