Next
शारीरिक स्वास्थ्य संतुलन - हीलिंग!
प्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)
Tuesday, June 19, 2018 | 03:00 PM
15 0 0
Share this story

नकारात्मक विचार आपलं मानसिकच नव्हे, तर शारीरिक स्वास्थ्यही बिघडवतात. त्यामुळे त्यापासून सुटका करून घेऊन सकारात्मक विचार आणि ऊर्जेच्या मदतीने मन आणि शरीर, दोन्ही तंदुरुस्त करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणून हीलिंग या उपचारपद्धतीकडे बघता येतं. ‘हीलिंग’द्वारे आपण आपली स्वतःचीच ताकद वापरून स्वतःचे प्रश्न कसे सोडवू शकतो, ते वृषाली लेले यांनी ‘हीलिंग-एक प्रकाशवाट’ या पुस्तकातून सांगितलं आहे. त्या पुस्तकाचा हा परिचय...
......
‘हीलिंग’ या उपचारपद्धतीविषयी समाजात अजूनही गैसमज आहेत. यामध्ये तंत्र-मंत्र, जादूटोणा, संमोहन वगैरे गोष्टींचा वापर केला जातो, असं मानून त्यापासून लांब राहणारे लोक समाजात आहेत; पण असे सर्व गैरसमज दूर करून हीलिंगमुळे लोकांना कसे आणि किती फायदे झाले, ते वृषाली लेले यांनी आपल्या ‘हीलिंग-एक प्रकाशवाट पुस्तकातून अनेक केस स्टडीजच्या साह्याने दाखवून दिलं आहे. 

हीलिंग करणारी व्यक्ती म्हणजे हीलर, रुग्णाला त्याची स्वतःची ताकद वापरून स्वतःचे प्रश्न सोडवायला मदत करतो. यामध्ये समोरून देता येणाऱ्या हीलिंगबरोबरच डिस्टन्स (दूरस्थ) हीलिंगसुद्धा देता येतं.
आपली मानसिक स्थिती आणि विचारशैली आपल्या मानसिक आरोग्यावर थेट आणि शारीरिक आरोग्यावर अप्रत्यक्षरीत्या परिणाम करत असते. त्यावर हीलिंग उपचारपद्धती हा उतारा आहे. हीलिंगमुळे मन शांत होतं. सुदृढ होतं. वैचारिक गोंधळ कमी होतो. शरीर आरोग्यपूर्ण बनतं. ताणतणाव हाताळायची क्षमता वाढते. आणि त्यामुळे आपण सकारात्मकतेने आपल्या समस्यांना सामोरे जाऊन त्यांवर विजय मिळवू शकतो. आपला व्यक्तिगत विकास होतो.

या उपचारपद्धतीमध्ये ऊर्जेचा वापर केला जातो. आणि उपचार घेणाऱ्याला तो नियमित घेत असलेली कोणतीही औषधं किंवा इतर उपचार बंद करावे लागत नाहीत. ही उपचारपद्धती सूक्ष्म स्तरावर काम करते. वृषाली लेले यांनी एक छान उदाहरण देऊन हे स्पष्ट केलं आहे - चेहऱ्यावर डाग असतील तर ते दूर करण्यासाठी आरसा स्वच्छ करून काहीच उपयोग नसतो, त्या डागांचं मूळ कारण शोधून त्यावर उपाय करणं गरजेचं असतं. तसंच हीलिंगसुद्धा मूळ कारणापर्यंत पोहोचून उपचार करतं.

यात वृषाली लेले यांनी अनेक केस स्टडीज देत असताना, त्यांची स्वतःची खडतर जीवनकहाणीही दिली आहे. आयुष्यात त्यांना कराव्या लागलेल्या संकटांचा सामना आणि पुढे हीलिंग उपचारपद्धतीने झालेला फायदा आणि त्यातून उभारी घेऊन त्यांनी आईच्या नावे सुरू केलेलं हीलिंग सेंटर... त्यातून लोकांना होत असलेला फायदा याची विस्तृत माहिती या पुस्तकातून मिळते. जरूर वाचावं असं हे पुस्तक आहे! 

पुस्तक : हीलिंग - एक प्रकाशवाट   
लेखिका : वृषाली गिरीश लेले   
प्रकाशिका : वृषाली गिरीश लेले, वृंदावन - ३, सी विंग, रहेजा टाउनशिप, मालाड (पूर्व), मुंबई - ४०००९७ 
संपर्क : ९१६७१ ७७७३२  
पृष्ठे : ९५ 
मूल्य : १८०  ₹ 

(‘हीलिंग-एक प्रकाशवाट’हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link