Next
ग्रेट एस्केप
BOI
Saturday, November 18 | 11:55 AM
15 0 0
Share this story

अमोल जाधव लिखित या कादंबरीचा नायक शरद हा एक पत्रकार आहे. शेतकरी आंदोलनावर लिहिलेल्या प्रक्षोभक लेखामुळे तो तुरुंगात जातो. त्याची नोकरीही जाते. दुसरीकडे नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतो; पण तात्विक वाद होऊन ती कंपनीही त्याला सोडावी लागते; मात्र कंपनीची मालकीण सिमरन त्याच्या प्रेमात पडते. पुढे अफगाणिस्तानात जाऊन वार्तांकन करण्याची त्याला संधी मिळते. सिमरनचे प्रेम की अफगाणीस्तान या द्विधा मन:स्थितीत सापडलेला शरद अखेर अफगाणिस्तानला जातो. तेथील अस्थिर समाज व राजकारण त्याला भारताच्या स्थितीची आठवण करून देत राहते. तेथे त्याला हमीद भेटते. हमीदच्या नवऱ्याचा खून, तिच्या हरवलेल्या मुलांना शोधणारी यासीन, शरद व मसूदवर हल्ला आदी गोष्टी क्रमाक्रमाने पुढे येतात आणि उत्कंठा वाढते.    

प्रकाशक : महाजन ब्रदर्स
पाने : १६८  
किंमत : २३५ रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link