Next
श्रीराम लाइफ इन्शुरन्स आणि शुअरबडीची भागीदारी
प्रेस रिलीज
Monday, February 12 | 03:10 PM
15 0 0
Share this story

कॅसपारूस जाकोबस हेन्ड्रीक क्रोमहूटमुंबई : ‘श्रीराम ग्रुप’ या प्रख्यात कंपनीच्या ‘श्रीराम लाइफ इन्शुरन्स’तर्फे ‘शुअरबडी’ या कंपनीशी हातमिळवणी करण्यात आली आहे. ‘शुअरबडी’ ही कंपनी विमा तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कार्यरत असून, या कंपनीतर्फे आर्थिक सेवासुविधा पुरविल्या जातात. या दोन्ही कंपन्या एकत्रित येऊन ग्राहकांना ५० हजार रुपयांचे मोफत विमाकवच पुरविणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ या मोहिमेशी ही योजना जोडण्यात येणार आहे.

या योजनेच्या पूर्ततेसाठी ‘फ्री लाइफ इन्शुरन्स पॉवर्ड बाय शुअरबडी’ नावाचे अँड्रॉइड अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ ग्राहकांना होणार असून, त्यांच्या मोबाइलवर जाहिरातींचे सादरीकरण होऊन त्यांना विमाकवचाची सुविधा प्राप्त होईल. जाहिरातीच्या प्रतिमा ह्या सलग असून त्या फोननंतर किंवा लिखित संदेशानंतर ग्राहकांना प्राप्त होतील. एका ‘टॅप’द्वारे या  जाहिराती थांबविण्याचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ग्राहकांना या जाहिराती पाहण्यासाठी संपूर्ण महिन्याभरातील केवळ पाच मिनिटांचा कालावधी पुरेसा ठरेल, अशी सुविधा ‘श्रीराम ग्रुप’च्या वतीने करण्यात आली आहे. आपले विमाकवच सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राहकांना जाहिरातींचे संदेश पाहणे बंधनकारक असून, त्यांना आर्थिक सेवासुविधाही मिळ‌तील. 

श्रीराम लाइफ इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कॅसपारूस जाकोबस हेन्ड्रीक क्रोमहूट म्हणाले, ‘या उपक्रमाद्वारे सर्वसामान्य ग्राहकांना सुरक्षित विमा कवच जालात आणण्याची आमची योजना आहे. ही योजना भारतामधील विमा क्षेत्राचे चित्र बदलून टाकणार आहे. समाजाच्या निम्न स्तरामधील लोकांना मदत करण्याची कंपनीची धारणा आहे. डिजिटायझेशनमुळे सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत वेगाने पोचणे शक्य होणार असून, त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे. हा बदल करताना ग्राहकसेवेतील सर्वोच्च मापदंडांचे पालन केले जाईल.’

कॅसपारूस जाकोबस हेन्ड्रीक क्रोमहूट, जोहान बास्सोन, लोडवॅक स्पाइज‘भारतासारख्या विकसनशील देशामध्ये एखाद्या कुटुंबातील मुख्य व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबातील इतर सदस्यांना पुढील काही वर्षांसाठी मोठा आर्थिक फटका बसतो. शुअरबडी ही कंपनी या समस्येवर उपाय असून, पीडितांना खरोखरीच मदत मिळणार आहे. त्याद्वारे विमा क्षेत्राचे चित्रच पालटले जाणार आहे. सर्वसामान्य लोकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढण्याचे सामर्थ्य मोबाइल फोनमध्ये आहे, असा विश्वास संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केला आहे. शुअरबडीनेही याच विश्वासावर आपले शिक्कामोर्तब केले आहे. ‘एकीद्वारेच आपण सर्व संकटांपासून मुक्त आहोत’ हे आमचे ब्रीद वाक्य आहे. डिजीटायझेशनद्वारे विम्याची रक्कम देयके वेळेत दिली जातील. त्यामुळे गरजू लोकांना भविष्याच्या दृष्टीनं त्याचा खूप लाभ होईल. हाच आमचा हेतू आहे.’ अशी माहिती ‘शुअरबडी’चे सहसंस्थापक जोहान बास्सोन यांनी दिली.

शुअरबडीच्या ऑनलाइन क्षेत्रामधील कौशल्याचा आणि श्रीराम लाइफ इन्शुरन्सच्या स्थानिक ज्ञानाचा उपयोग होईल, अशा पद्धतीने या दोन कंपन्या एकत्र आल्या आहेत. त्यामुळे भारतीय विमा क्षेत्राच्या डिजिटल युगात एक नवीन ताकद निर्माण झाली आहे. त्याचा लाभ विमा सेवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचण्यासाठी होणार आहे.

श्रीराम लाइफ इन्शुरन्स : 
‘श्रीराम लाइफ इन्शुरन्स कंपनी’ (एसएलआयसी) ही कंपनी ‘श्रीराम ग्रुप’चा विमा विभाग आहे. ‘श्रीराम ग्रुप’ हे वित्तीय सेवा पुरवठादार क्षेत्रामधील आघाडीचे नाव असून, भारतामधील उद्योग क्षेत्रात या कंपनीने आदराचे स्थान मिळवले आहे. या ‘ग्रुप’तर्फे कमी उत्पन्न असलेले कुटुंब आणि छोट्या व्यावसायिकांना मदत केली जाते. ‘श्रीराम लाइफ इन्शुरन्स’ची स्थापना २००६ मध्ये करण्यात आली. ‘एसएलआयसी’ही ‘सनलाम’ आणि ‘श्रीराम ग्रुप’ यांच्या भागीदारीतून पुढे आलेली कंपनी आहे. ‘श्रीराम लाइफ इन्शुरन्स’चा समाजाच्या विविध स्तरातील नागरिकांपर्यंत विमाकवच पुरविण्याची, तसेच आर्थिक सुविधा देण्याची योजना आहे. या संस्थेची भारतामधील कार्यालयांचे जाळे मोठे असून, एकूण सहाशे चार ठिकाणी कार्यालये आहेत.

शुअरबडी : 
विमातंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘शुअरबडी’ची स्थापना २०१६मध्ये करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेशी असणाऱ्या या कंपनीचे कर्मचारी आफ्रिका, इस्त्राइल आणि इंग्लंडमध्ये कार्यरत आहेत. जोहान बास्सोन आणि लोडवॅक स्पाइज या दोन सहसंस्थापकांची पार्श्वभूमी लेखा आणि वित्तीय क्षेत्रामधील आहे.  ज्या लोकांचा वित्तीय सेवांशी संबंध येत नाही, अशांना मदत करण्यासाठी ही कंपनी पुढाकार घेते.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link