Next
उपमहापौरांच्या पुढाकाराने विजयस्तंभ परिसराची स्वच्छता
प्रेस रिलीज
Thursday, January 03, 2019 | 03:35 PM
15 0 0
Share this article:

पुणे : कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभास शौर्यदिनानिमित्त एक जानेवारी २०१९ रोजी अभिवादन करण्यासाठी लाखो भीमसैनिक आले होते. अतिशय शांततेत हा अभिवादन सोहळा पार पडला. मानवंदना दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दोन जानेवारीला पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पुढाकार घेऊन विजयस्तंभ परिसराची स्वच्छता केली.

डॉ. धेंडे यांनी सकाळी सात वाजता कोरेगाव-भीमा येथे येऊन सरपंच रूपेश ठोंबरे यांची भेट घेतली. त्यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, कोरेगाव-भीमाचे उपसरपंच शिवाजी वाळके, महिला समिती आयुक्त सुवर्णा चव्हाण व स्वच्छ संस्थेचे कर्मचारी यांना घेऊन परिसराची स्वच्छता केली.

विजयस्तंभ अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय आल्याने विजयस्तंभावजवळ पुष्पचक्र, फुले आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणात जमा झाले होते; तसेच परिसरात पाण्याच्या बाटल्या, नाश्त्याच्या प्लेट्स, जेवणाच्या पत्रावळ्या असा कचरा पडला होता. नगर रस्त्यावरील लोणीकंद ते कोरेगाव-भीमा हा परिसरही स्वच्छ करण्यात आला. डॉ. धेंडे यांनी स्थानिकांच्या सहकार्याने ही स्वच्छता मोहीम राबविली.

याबाबत बोलताना उपमहापौर डॉ. धेंडे म्हणाले, ‘विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी यंदा मोठी गर्दी झाली. प्रशासनाने अतिशय काटेकोर नियोजन केले होते; मात्र, गर्दीचा अंदाज न आल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडी वगळता अभिवादनाचा कार्यक्रम अतिशय शांततेत झाला. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search