Next
जीएसटीआर-९ कोणत्याही विलंबाशिवाय तयार करणे आवश्यक
BOI
Monday, June 03, 2019 | 02:48 PM
15 0 0
Share this article:

आपण लवकरच जीएसटीच्या तिसऱ्या वर्षात पाऊल ठेवणार आहोत. सध्या व्यावसायिक जीएसटी अंमलबजावणीचे पहिले वर्ष २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी कम्प्लायन्ससाठी संघर्ष करीत आहे. २०१७-१८साठी वार्षिक परतावा ज्याला जीएसटीआर-९ म्हटले जाते त्याची देय तारीख ३० जून २०१९ आहे, तो जटिल फॉर्म आहे ज्यासाठी गहन पुनर्मेळ करणे आवश्यक आहे. ‘क्लिअरटॅक्स’चे संस्थापक आणि सीईओ अर्चित गुप्ता या विषयी माहिती देत आहेत.
................................................................

जीएसटीआर-९ हा वार्षिक परतावा फॉरमॅट आहे व जीएसटी अंतर्गत नोंदणी केलेल्या प्रत्येकासाठी तो भरणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नियमित करदात्यांनी जीएसटीआर-९ भरणे आवश्यकच आहे, तर कम्पोझिशन स्कीम करदाते व ई-कॉमर्स संचालकांसाठी वेगळा फॉर्म आहे. दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या करदात्यांनी जीएसटीआर-९ सोबत जीएसटीआर-९सी भरणे आवश्यक आहे. जीएसटीआर-९सी हा लेखापरिक्षित आर्थिक खात्यांनुसार जीएसटीआर-९ (वार्षिक जीएसटी परतावा) व जीएसटीचा पुनर्मेळ आहे. व्यवसायाच्या प्रत्येक जीएसटीआयएनसाठी जीएसटीआर-९ भरणे आवश्यक आहे.

जीएसटीआर-९ भरण्याचे मुख्य स्त्रोत म्हणजे परतावे, जीएसटीआर-१ आणि जीएसटीआर-३बी आहे. व्यवसायांनी पुरवठा केलेल्याचा रिपोर्ट देण्यास जीएसटीआर-१ व्यवसायांद्वारे भरला जातो आणि जीएसटीआर-३बी करांचे पेमेंट करण्यास वापरला जातो. जीएसटीआर-९ कदाचित या २ परताव्यांचे संकलन भासत असले, तरी ते एवढे सोपे नाही. यासाठी करदात्यांनी गहन पुनर्मेळ करणे आवश्यक असते. हा पुनर्मेळ त्यांनी रिपोर्ट केलेला पुरवठा, भरलेले कर आणि त्यांच्या विक्रेत्यांनी फाइल केलेले यांच्यादरम्यान व लेखापुस्तकांसह होणे आवश्यक आहे. जीएसटीआर-९ मध्ये मागितलेली माहिती तक्त्यांमध्ये विभागलेली असते, ज्यातील काही आधीच भरलेल्या परताव्यांनी ऑटो-पॉपुलेट होतात, तर काहींना करदात्यांद्वारे स्वत: भरायचे असते.

काही करदाते ज्यांनी एका आर्थिक वर्षाचा आरसीएम कर पुढच्या आर्थिक वर्षाच्या जीएसटीआर-३बी मध्ये भरला असतो त्यांना कदाचित रिपोर्टिंगची समस्या समोर येऊ शकते. समजा एफवाय २०१८-१९ चा आरसीएम कर जीएसटीआर-३बीद्वारे भरला असेल; मात्र सप्लाइज (इनवर्ड सप्लाइज) २०१७-१८ या आर्थिक वर्षात मिळाल्या असतील. अशा प्रकारे की ज्यामुळे माहिती तक्त्यामध्ये भरलेली असेल, जसे की कराचे पेमेंट जर भरले असेल, तर जीएसटीआर-९ मध्ये वाढत्या उलाढालीचा प्रभाव पडतो ज्यामुळे अंतर वाढते.

जीएसटीआर-१ फॉर्म करदात्यांना केलेल्या सप्लाइजसाठी भर आणि बदलांचा रिपोर्ट करण्याची सुविधा देतो. तर भरलेले वास्तविक कर जीएसटीआर-३बीद्वारे वार्षिक परताव्यात दाखवलेले असतात. जीएसटीआर-९ चा तक्ता क्रमांक १० आणि तक्ता क्रमांक ११चा वापर केलेल्या बदलांचा रिपोर्ट करण्यास करायचा आहे आणि दिलेल्या माहितीच्या आधारे जीएसटीआर-१ नुसार असणे आवश्यक आहे; मात्र, तक्ता क्रमांक ९मध्ये जीएसटीआर-३बी प्रमाणे भरलेले कर समाविष्ट असतात, ज्यामुळे वार्षिक परताव्यात बदल सामील कसे करावे याचा गोंधळ होतो. यामुळे माहितीच्या दोन संचात विसंगती उत्पन्न होऊ शकते.

अशाही घटना घडलेल्या आहे, की काही लहान व्यवसायांनी ऑनलाइन कर भरले; मात्र संसाधन व वेळेअभावी चुकीचा जीएसटीआर-३बी भरला. त्यामुळे ते अशा स्थितीत सापडले की ज्यात कर भरलेले आहेत मात्र जीएसटीआर-३बीद्वारे जीएसटीआर-९च्या ऑटो-पॉपुलेट होणाऱ्या भागात चुकीची मूल्ये दिसत आहे.

काही व्यवसायांनी अद्याप जीएसटीआर-१, जीएसटीआर-२ए आणि जीएसटीआर-३बी दरम्यान पुनर्मेळ केलेला नाही. फायलिंगच्या प्रक्रियेत बरेच बदल होत असल्याने काही जीएसटीआर-९च्या कम्प्लायन्सपासून दूरच राहिलेले आहे. काही व्यवसायांना पुरर्मेळ न होण्याच्या समस्या (वर चर्चा केलेली आहे) आलेल्या आहे किंवा बी२बी विक्री आणि बी२सी ची रिपोर्ट चुकलेली आहे व आता त्यात बदल करता येत नाही (कारण की फक्त एकदाच बदल करण्याची परवानगी आहे).

अर्चित गुप्ताजीएसटीआर-९ च्या यशस्वी फायलिंगसाठी डाटाची गहन समीक्षा व पुनर्मेळ घालणे गरजेचे आहे. लेखापुस्तके व जीएसटी वार्षिक परतावा दरम्यान अंतराची कारणे समजणे समाधानकारक कम्प्लायंससाठी महत्वाचे आहे. हजारो वस्तूंच्या डाटाचा स्मार्ट सॉल्यूशनशिवाय पुनर्मेळ घालणे शक्य नाही, ज्यामुळे अंतर लगेच दिसून येते व भरता येते. त्यामुळे व्यवसायांनी कसल्याही विलंबाशिवाय जीएसटीआर-९ ची तयारी सुरू करायला हवी. जीएसटीआर-९ सोबतच्या समस्या लगेच सोडवायला हव्या. हे काम प्राधान्यक्रमाने करायला हवे कारण की नवीन जीएसटी परतावा तंत्राचे नियोजन सुरू आहे. शेवटी, पहिल्या वर्षाच्या यशस्वी सांगतेमुळे करदात्यांना पुढे जाणे आणि पुढच्या वर्षासाठी डाटा जुळणी व पुनर्मेळची तयारी करण्यास मदत मिळेल.

दुर्दैवाने, काही करदात्यांना लेखापुस्तके व जीएसटी दरम्यान पुरर्मेळ करण्याची धास्ती वाटते कारण की ते म्हणतात की कर अधिकारी जी उलाढाल जास्त असेल त्याप्रमाणे जीएसटी भरायला लावतील व सरकारसाठी जास्त कर संकलन करतील. त्यामुळे जास्त छाननी होऊन जास्त नोटीसा व वाद उत्पन्न होतील; तसेच, विक्रेत्याच्या चुकीमुळे जेथे आयटीसी उपलब्ध नसेल तेथे खरेदीदार क्रेडिट सोडण्यास तयार नसतील ज्यामुळे अधिकाऱ्यांसोबत संभाव्य वाद होऊ शकतात. विशेष म्हणजे जीएसटीआर-९द्वारे कोणताही अतिरिक्त आयटीसी दावा करता येत नाही, जरी पुनर्मेळदरम्यान अतिरिक्त देय कर आढळला, तर तो सरकारकडे जमा करणे आवश्यक असते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search