Next
‘व्हीव्हीपीएटी’ प्रणालीच्या वापराची ‘राष्ट्रवादी’ची मागणी
प्रेस रिलीज
Saturday, October 07 | 05:46 PM
15 0 0
Share this story

पुणे : शहरात महापालिकेची कोरेगाव पार्क, घोरपडी प्रभाग क्रमांक २१ येथे पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत ‘व्हीव्हीपीएटी’ (Voter Verifiable Paper Audit Trail) प्रणालीचा वापर व्हावा, अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांनी केली आहे.

या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त, पुणे पालिका आयुक्त कुणाल कुमार, पुणे पालिका निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी यांना याबाबतच्या मागणीचे पत्र देण्यात आले आहे. पुणे महापालिकेची कोरेगाव पार्क, घोरपडी येथे पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी ११ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रशासनाने मतदानासाठी ईव्हीएम पद्धत वापरली होती; परंतु, मतदान केल्यावर विशिष्ठ राजकीय पक्षालाच सरसकट मतदान झाल्याच्या तक्रारी मोठ्या संख्येने राज्य निवडणूक आयोगाकडे गेल्या आहेत; तसेच त्याबाबत विविध न्यायालयातही याचिका प्रलंबित आहेत. त्यामुळे मतदारांच्या मनात ईव्हीएम मतदान पद्धतीबद्दल शंका निर्माण झाली आहे.

‘मतदान पद्धतीबद्दल मतदारांच्या मनात कोणतीही शंका राहू नये, याची काळजी घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगांची आहे. देशातील विविध न्यायालयांनीही या पद्धतीचा अवलंब करण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने देखील यापुढील निवडणुका ‘व्हीव्हीपीएटी’ पद्धतीने करणार असल्याची घोषणा केली. नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी ‘व्हीव्हीपीएटी’चा वापर केला जाणार आहे. त्याच धर्तीवर पुणे महापालिका प्रभाग क्र. २१ कोरेगाव पार्क, घोरपडी येथील पोटनिवडणूक मध्ये ‘व्हीव्हीपीएटी’ प्रणालीचा वापर व्हावा, अशी आमची मागणी आहे,’ अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link