Next
‘रीबर्थ फाउंडेशन’ची ‘भारत ऑर्गन यात्रा’
प्रमोद महाजन यांनी १०० दिवसात केला १९ राज्यांचा दौरा
BOI
Friday, January 25, 2019 | 07:19 PM
15 0 0
Share this story

पुणे : येथील ‘रीबर्थ फाउंडेशन’च्या वतीने अवयव दानाबाबत जनजागृती करण्याचे कार्य केले जाते. सदर संस्था तीन वर्षांपासून हे कार्य करत असून आजवर संस्थेने अनेक उपक्रम राबवले आहेत. संस्थेच्या वतीने राबवण्यात आलेल्या ‘भारत ऑर्गन यात्रे’ला मोठा प्रतिसाद  मिळाला आहे. 

संस्थेचे प्रमोद महाजन (वय ६७) यांनी ६०व्या वर्षी आपली एक किडनी एका जवानाला दान केली. इतके करून ते थांबले नाहीत, तर अवयवदानाच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांनी १०० दिवसांत देशातील १९ राज्यांमध्ये प्रवास करून याबाबत जनजागृती केली. त्यांच्या या उपक्रमास अनेक संस्था आणि संघटनांनी पाठिंबा दिला. 

२१ ऑक्टोबर २०१८ला शनिवार वाड्यापासून या प्रवासाची सुरुवात करून ते २५ जानेवारी २०१९ला सारस बाग गणेश मंदिर याठिकाणी पोहोचले. यानिमित्ताने महाजन यांच्या स्वागतासाठी सारस बाग येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय ‘मायलेज मन्चर्स’ या बायकर्स ग्रूपच्या आणि ‘रीबर्थ फाउंडेशन’च्या कार्यकर्त्यांनी सासवड ते पुणे अशी रॅली काढून महाजन काकांचे जंगी स्वागत केले. 

दरम्यान येत्या २७ जानेवारीला पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात सकाळी १० ते १२ या वेळेत प्रमोद महाजन यांचा औपचारिक स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  

‘रीबर्थ फाउंडेशन’च्या कार्याची सविस्तस माहिती देणारा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link