Next
निकामी होणाऱ्या हाताला वाचविण्यात ‘वोक्हार्ट’च्या डॉक्टरांना यश
६५ वर्षीय शांतीलाल जैन यांच्यावर यशस्वी उपचार
प्रेस रिलीज
Thursday, April 11, 2019 | 12:22 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील हृदयविकारतज्ज्ञ डॉ. रवी गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली टीमला ६५ वर्षीय शांतीलाल जैन यांच्या हातातील रक्तवाहिनीत झालेल्या गुठळीवर यशस्वी उपचार करत निकामी होणाऱ्या हाताला वाचविण्यात यश आले आहे.

जैन यांना मधुमेह असून, ते डायलिसिसवर आहेत. बायपास शस्त्रक्रियेनंतर त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांनी घेरले. उजवा हात काळानिळा पडल्याची तक्रार घेऊन ते मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. कलर डॉपलर आणि अँजिओग्राफी करून डॉक्टरांनी आजाराचे निदान केले. दोन रक्तवाहिन्या हाताला रक्तपुरवठा करतात. यापैकी एक रक्तावाहिनी (रेडियल रक्तवाहिनी) एव्ही फिस्टुलासाठी वापरली गेली होती आणि ती फिस्टुलामध्येच सगळे रक्त घालवत होती, त्यामुळे हाताला पुरवठा करत नव्हती (स्टील फिनोमेना). दुसऱ्या म्हणजेच ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेणाऱ्या हातातील रक्तवाहिनीत १०० टक्के दीर्घकाळ टिकून राहणारी कॅल्सिफाइड गुठळी (कॅल्शिअमचे कण जमा झाल्याने होणारा अडथळा) होती. म्हणून उजव्या हाताला रक्तपुरवठा होत नव्हता. डाव्या बाजूची रेडिअल रक्तवाहिनी बायपाससाठी वापरली गेल्यामुळे दुसऱ्या एव्ही फिस्टुलासाठी पर्यायच उपलब्ध नव्हता.

हाताच्या रक्तवाहिनीमध्ये गुठळ्या होणे हा चक्रीय आजार असून, यात रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण होतात किंवा त्या निमुळत्या होतात. त्यामुळे ऑक्सिजनयुक्त रक्त हातापर्यंत पोहोचवणे त्यांना शक्य होत नाही. रक्तातील कोलेस्टरॉलची प्रमाणापेक्षा अधिक पातळी, बैठी जीवनशैली, मधुमेह, उच्च रक्तदाब, तंबाखू आदी अनेक घटकांमुळे ही परिस्थिती उद्भवू शकते. हा आजार जसजसा बळावतो तसतशी त्वचा काळीनिळी दिसू लागते. निमुळत्या झालेल्या रक्तवाहिन्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन पोहोचवू न शकल्याने हे लक्षण दिसू लागते. या आजारामुळे हात कापावा लागू शकतो, हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता असते.

डॉ. रवी गुप्ता‘वोक्हार्ट’मधील हृदयविकारतज्ज्ञ डॉ. गुप्ता म्हणाले, ‘आम्ही हार्ड वायर आणि बलूनचा उपयोग करून रक्तवाहिनी खुली केली, जेणेकरून तळहाताला होणारा रक्तप्रवाह सुरू होऊ शकेल. या प्रक्रियेमध्ये हात वाचविण्याबरोबरच त्यांच्या नियमित डायलिसिससाठी एव्ही फिस्टुला वाचविणेही आवश्यक होते.’

अधिक माहिती देताना डॉ. गुप्ता म्हणाले, ‘तुमच्या हाताच्या रक्तवाहिन्यांचा विकार दर्शवतो की, हाताच्या रक्तवाहिनीमध्ये झालेल्या गुठळीमुळे रक्तपुरवठा कमी झाला आहे. यामुळे हाताचा वापर केल्यास हाताला थकवा येतो, वेदना होते, अशक्तपणा येतो. पेरिफेरल अर्टरी डिसीज (पीएडी) हा पाय आणि पावलामध्ये सर्रास आढळून येणारा आजार आहे; पण बाहु किंवा हातातील रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे होणाऱ्या आजाराचा यात समावेश नाही. या प्रकारच्या ‘पीएडी’ला डॉक्टर अप्पर एक्स्ट्रिमिटी पीएडी असे म्हणतात. पाय किंवा पावलांच्या तुलनेने या प्रकारचा ‘पीएडी’ फार आढळून येत नाही. केवळ १० टक्के व्यक्तींना हा आजार होतो.’

‘बधिरपणा आणि काळेनिळे पडणे यामुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना काळजी वाटत होती. माझा हात वाचविल्याबद्दल आणि वेळेवर उपचार केल्याबद्दल मी डॉक्टरांचे आभार मानतो,’ अशी प्रतिक्रिया जैन यांनी व्यक्त केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search