Next
विद्या बालन साकारणार मायावती
BOI
Thursday, March 28, 2019 | 04:11 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये चरित्रपट म्हणजेच बायोपिकची चलती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर येणाऱ्या चरित्रपटांनंतर आता बसपा अध्यक्ष मायावतींवर चित्रपट येणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये अभिनेत्री विद्या बालन मायावती यांची भूमिका साकारणार आहे. 

‘जॉली एलएलबी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर या चित्रपटाचे    दिग्दर्शक असतील. मायावतीच्या भूमिकेसाठी सात-आठ    अभिनेत्रींच्या नावांचा विचार सुरू होता, मात्र विद्या बालनच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची जोरदार चर्चा आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकाकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटाचे नाव, चित्रीकरणाला कधीपासून सुरुवात होईल याबद्दल काहीच माहिती देण्यात आलेली नाही. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search