Next
दाणी दाम्पत्याचे ‘टिक टॉक’वरील सामाजिक आशयाचे व्हिडिओ लोकप्रिय
BOI
Saturday, August 17, 2019 | 06:12 PM
15 0 0
Share this article:

नाशिक : नाशिक रोडच्या माजी नगरसेविका वैशाली दाणी आणि त्यांचे पती प्रमोद दाणी यांनी ‘टिक टॉक’वर तयार केलेले सामाजिक आशयावरील व्हिडिओ लोकप्रिय झाले आहेत. २८ लाख जणांनी हे व्हिडिओ लाइक केले आहेत.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, निवृत्तीमहाराज देशमुख आदींचे सामाजिक संदेश दाणी यांनी काही व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहेत. तसेच अन्य सामाजिक आशयही काही व्हिडिओंमध्ये आहे. काही व्हिडिओ त्यांनी फेसबुकवरही शेअर केले आहेत. ‘टिक टॉक’वर त्यांचे व्हिडिओ सुमारे २.८ मिलियन (२८ लाख) जणांनी लाइक केले असून, फॉलोअर्स आणि व्हिडिओ बघणाऱ्यांची संख्या वाढत जात आहे. परदेशातील नागरिकांची या व्हिडिओला प्रतिसाद मिळत असल्याचे दाणी यांनी सांगितले. हे व्हिडिओ पाहून दाणी यांना नाट्य क्षेत्रामधून अभिनय करण्याच्या ऑफर्स येत आहेत.

‘सामाजिक आशयावर व्हिडिओ तयार करण्याची इच्छा खूप दिवसांपासून होती. ‘टिक टॉक’मुळे हे व्हिडिओ तयार करता आले. त्याचे लाइक्स वाढत आहेत. सध्या न्यायालयाच्या निर्देशानुसार हे व्हिडिओ बंद करण्यात आले आहेत. सोशल मीडियाचा चांगलाही वापर करता येऊ शकतो हे दाखवण्याचा आमचा हा लहानसा प्रयत्न होता,’ असे प्रमोद दाणी यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Pramod Dani About 30 Days ago
Thanks you very much Harshu for making such beautiful article on me.
0
0
योगेश निसाळ About 30 Days ago
सर आपले व्हिडीओ मी नेहमी बघतो ..! खूपच छान
1
0

Select Language
Share Link
 
Search