Next
पुण्यात होणार चॉकलेटवर संशोधन
BOI
Monday, July 30, 2018 | 05:09 PM
15 0 0
Share this story

पुणे : चॉकलेट हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा पदार्थ आहे. भारतामध्ये चॉकलेट १७व्या शतकात आले; पण भारतीय बाजारात ते कँडी स्वरूपात विकले जाते. त्यात खऱ्या चॉकलेटची मात्रा १२ ते १५ टक्के इतकीच असते. म्हणूनच चॉकलेटवर संशोधन आणि त्याचा प्रसार, प्रचार करण्याच्या उद्देशाने पुण्यात ‘इंटरनॅशनल चॉकलेट रिसर्च अँड इनोव्हेशन कौन्सिल’ची स्थापना करण्यात आली आहे. पुण्यातील ‘महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग’च्या सभागृहात २९ जुलै २०१८ रोजी या कौन्सिलची स्थापना करण्यात आली.

या वेळी या कौन्सिलचे अध्यक्ष सानी अवसरमल, कॅडबरी इंडिया कंपनीचे माजी तंत्र प्रमुख सोली केकोबाद, ‘बिंद्रा हॉस्पिटॅलिटी’चे प्रमुख गुरविंदर बिंद्रा, झेलॉस चॉकलेट कंपनीचे तुकाराम भांगर, अभिरू विश्वास, भारतीय फूड ट्रक असोसिएशनचे उपाध्यक्ष कुरेश बहारेनवला आणि इंटरनॅशनल चॉकलेट टेस्टर मंदार भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

‘कौन्सिलच्या माध्यमातून चॉकलेट उत्पादक कंपन्या, विपणन विभाग आणि कच्चा माल खरेदीदार, आयात निर्यात घटक आणि शासकीय संस्था एका छताखाली एकत्र येऊन चॉकलेटचे शुद्ध स्वरूप भारतीय ग्राहकांना  देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सध्या भारतात जे चॉकलेट मिळते त्यात काही प्रमाणातच खरेपणा आणि शुद्धता आहे. भारतीय ग्राहकांना शुद्ध व दर्जेदार चॉकलेटची चव चाखायला देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शुद्ध स्वरूपातील चॉकलेट कसे असते, ते कसे ओळखावे आणि त्याचे आरोग्यवर्धक फायदे कसे आहेत, याची जनजागृती करणार आहोत,’ असे इंटरनॅशनल चॉकलेट टेस्टर मंदार भोसले यांनी या वेळी सांगितले.

(चॉकलेट टेस्टर मंदार भोसले यांचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link