Next
‘ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल’ला ब्रिटिश कौन्सिलचा पुरस्कार
प्रेस रिलीज
Monday, November 27, 2017 | 05:50 PM
15 0 0
Share this article:

ब्रिटिश कौन्सिलचा पुरस्कार हेलेन सिल्वेस्टर यांच्या हस्ते स्वीकारताना हर्षदा जाधव, शकुंतला जयसिंगानी आणि काजल छातीजा.
पुणे : ब्रिटिश कौन्सिलतर्फे दिला जाणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘ब्रिटिश कौन्सिल इंटरनॅशनल  स्कूल अॅवॉर्ड’ (आयएसए) पुरस्कार  येथील के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या ट्रिनिटी इंटरनॅशनल  स्कूलला मिळाला आहे. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ब्रिटिश कौन्सिल, वेस्ट इंडियाच्या संचालिका हेलेन सिल्वेस्टर यांच्या हस्ते संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, शाळेच्या मुख्याध्यापिका शकुंतला जयसिंगानी, पर्यवेक्षिका काजल छातिजा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

युवापिढीला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकमेकांशी जोडून त्यांना घडविण्याचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ब्रिटिश कौन्सिल हा पुरस्कार देऊन गौरव करते. इनोवेशन, टीम बिल्डिंग, प्रकल्प आदी गोष्टींवर भर दिला जातो.

 याबाबत बोलताना हर्षदा जाधव म्हणाल्या, ‘रेन वाटर हार्वेस्टिंग, युद्धावरील इंग्रजी कविता, वैश्विक सांकेतिक भाषा, विविध संस्कृती, जागतिक समस्या जाणून घेत त्यावर कल्पक उपाय शोधण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांकडून केला गेला. शाश्वत विकासासाठी पर्यावरण आणि इतर जागतिक समस्यांवर जनजागृती करण्यावर भर दिला. राष्ट्रीय ध्वज, ऐतिहासिक वारसास्थळे, मॅपिंग सिमेंटरी यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली. विविध आंतरशाखीय प्रकल्पांत भाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना टोकियोच्या थाठवा इंटरनॅशनल  स्कूल, अबूधाबीच्या जेम्स  स्कूल आणि इंग्लंडच्या कोटमन्हे ज्युनिअर  स्कूलच्या विद्यार्थ्यांशी स्काइपवरून संवाद साधता आला.’

संस्थेचे खजिनदार विनोद जाधव म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना या वयात इतरांना समजून घेता आले पाहिजे. विविध कला, संस्कृतीची, जगभरात चालू असलेल्या कार्यक्रमाची ओळख झाली पाहिजे. त्यामुळे जागतिक स्तरावरील समस्यांची जाणीव होऊन त्या सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची भावना त्यांच्या मनात रुजेल’. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search