Next
कलार्थी संस्थेतर्फे ‘अभिन्यास’ सादर
प्रेस रिलीज
Tuesday, January 29, 2019 | 04:39 PM
15 0 0
Share this story

नृत्यकला सादर करताना कलार्थी संस्थेच्या विद्यार्थिनी.

पुणे : पंडित मनीषा साठे यांच्या ज्येष्ठ शिष्या गौरी स्वकुळ यांच्या कलार्थी संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त ‘अभिन्यास’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम बालशिक्षण सभागृह येथे झाला.

संस्थेच्या विद्यार्थिनींनी वंदना, त्रिताल, अभंग, कजरी, कृष्णाच्या रूपांचे वर्णन दर्शविणारा कृष्णायन, तराना, भजन, नमन अशा विविध रचना कथ्थक नृत्याच्या माध्यमातून सादर केल्या. जेंबे, मोहनवीणा आणि कथ्थक यांचा त्रिवेणी संगम असणारी ‘कॉन्फ्लूएन्स’ ही नवसंकल्पना या वेळी मांडण्यात आली. यात नितीन सातव यांनी जेंबे, मानस गोसावी यांनी मोहनवीणा, पढंत साथ मिथीला भिडे यांनी केली. गौरी स्वकुळ, स्वराली कुंभोजकर व स्वराली तळेले यांनी कथ्थक नृत्यकला सादर केली.

या वेळी ज्येष्ठ कथ्थक नृत्यकलाकार मनीषा साठे व पद्मश्री लीला पूनावाला फाउंडेशनचे विश्वस्त फिरोज पूनावाला, सुजाता नातू, सुरेश नातू आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम गांधी यांनी केले. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link