Next
हिमायतनगरमध्ये क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी
नागेश शिंदे
Thursday, August 22, 2019 | 02:21 PM
15 0 0
Share this article:



हिमायतनगर :
‘सरकारने हिमायतनगरच्या क्रीडा विभागासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे; मात्र जागेअभावी हिमायतनगर शहरातील क्रीडा संकुलाचे काम रखडले आहे. त्यामुळे क्रीडा स्पर्धा अपुऱ्या जागेत घ्याव्या लागतात. ही बाब लक्षात घेऊन परमेश्वर मंदिर कमिटी आणि नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी नगरपंचायतीच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे,’ अशी मागणी जिल्हा क्रीडा अधिकारी चव्हाण यांनी केली. पुढील वर्षीच्या स्पर्धा त्याच जागेत घेण्यात याव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शहरातील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयाच्या पटांगणात २१ ऑगस्टला नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.  



या वेळी पंचायत समितीच्या सभापती मायाताई राठोड, ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण शक्करगे, मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरशेठ श्रीश्रीमाळ, गटशिक्षणाधिकारी संगपवार, मंडळ अधिकारी राठोड, भाजप तालुकाध्यक्ष आशिष सकवान, रामभाऊ सूर्यवंशी, तालुका क्रीडा संयोजक के. बी. शन्नेवाड, वडगाव येथील शालेय व्यवस्था समिती अध्यक्ष गजानन ताडकुले, हेंद्रे, भावडे यांच्यासह पत्रकार, व्यापारी, शिक्षक आदी अनेक जण उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा भगीरथ शाळेचे मुख्याध्यापक अशोक अनगुलवार यांनी केले. उपस्थितांचे आभार तालुका क्रीडा संयोजक के. बी. शन्नेवाड यांनी मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search