Next
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्तेपदी गोपाळ तिवारी
BOI
Monday, October 07, 2019 | 02:39 PM
15 0 0
Share this article:

गोपाळ तिवारीपुणे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या प्रवक्तेपदी ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे माजी सदस्य व माजी नगरसेवक गोपाळ तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच मुंबईत तिवारी यांच्या नियुक्तीचे पत्र दिले. 

‘गोपाळ तिवारी हे अभ्यासू, कार्यक्षम व निष्ठावान कार्यकर्ते असून, गेल्या काही महिन्यांपासून ते माध्यमांमध्ये पक्षाची बाजू समर्थपणे मांडत आहेत, चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्यांच्या कार्याला अधिक वाव मिळावा; तसेच पक्षाची बाज़ू अधिक सक्षमपणे मांडता यावी, या हेतूने त्यांची प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे,’ असे थोरात यांनी सांगितले. 

प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याबद्दल गोपाळ तिवारी यांनी आनंद व्यक्त करत, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा विश्वास आणि पक्षाच्या अपेक्षांना खरे उतरण्याचा कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search