Next
फातिमा अल्लाना यांना आदरांजली
प्रेस रिलीज
Friday, July 13 | 03:08 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘शैक्षणिक, सामाजिक, अनाथालय संस्थांना उदार हस्ते मदत करून अल्लाना कुटुंबीयांनी औदार्याचा आदर्श निर्माण केला. सामाजिक काम करताना मदतीचा हात मिळतो, याची खात्री अल्लाना कुटुंबीयांमुळे झाली. त्यांचा आदर्श घेऊन ‘देणारे हात’ व्हावे’, असे आवाहन महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी केले.

मुंबईच्या मेमन समाजातील देणगीदार, अंजुमन खैरुल इस्लाम संस्थेच्या माजी अध्यक्ष, वर्ल्ड मेमन फाउंडेशनच्या माजी विश्वस्त फातिमा अल्लाना यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांना पुण्यात शोकसभेद्वारे आदरांजली वाहण्यात आली. ही शोकसभा आझम कॅंपसच्या असेंब्ली हॉलमध्ये झाली. या वेळी डॉ. इनामदार बोलत होते. या प्रसंगी विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह मुन्वर पीरभाय, अबेदा इनामदार, लतीफ मगदूम, अरिफ मेमन, झुबेर शेख, नाझिम शेख, डॉ. मुश्ताक मुकादम, एस. ए. इनामदार व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. इनामदार म्हणाले, ‘आझम कॅंपस, अंजुमन खैरुल इस्लाम, यतिमखाना अशा देशातील व देशाबाहेरील सामाजिक, शैक्षणिक कार्याला अल्लाना कुटुंबीयांनी नेहमी मदत केली. सधन व्यावसायिक म्हणून त्यांनी समाजाचा आधार बनणे पसंत केले. देणग्या देताना त्यातून होणाऱ्या कामावर लक्ष ठेवले. आझम कॅंपसमधील रंगूनवाला दंत महाविद्यालय, फार्मसी, आर्किटेक्चर , मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या स्थापनेत त्यांनी उदार हस्ते मदत केली. संस्थांच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवले. फातिमा अल्लाना तसेच अल्लाना कुटुंबीयांचे ऋण आझम कॅंपस कधीच विसरणार नाही.’

लतीफ मगदूम, अरिफ मेमन, प्राचार्य आर. गणेसन, डॉ. किरण भिसे, प्राचार्य लीना देबनाथ आदींनी मनोगत व्यक्त केले. डॉ. मुश्ताक मुकादम यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link