Next
भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रचारसभा
प्रेस रिलीज
Tuesday, May 22 | 03:52 PM
15 0 0
Share this story

मुंबई : महाराष्ट्रात होत असलेल्या विधानपरिषदा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचारामध्ये जोरदार मुंसडी मारली असून, विधानपरिषदांच्या निवडणुकीनंतर आता भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रचारात आजपासून (ता. २२) उतरणार असून, त्यांच्या तोफा धडाडणार आहेत.

विधानपरिषद निवडणुकीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक रिंगणात पूर्ण ताकदीनिशी उतरला असून, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतली आहे. २१ मे रोजी विधानपरिषदेचे मतदान झाल्यानंतर आणि पक्षाला विजय मिळवून देणारच असा ठाम पण करत राष्ट्रवादीची मुलुखमैदान तोफ म्हणून ओळख असलेले धनंजय मुंडे यांनी विधानपरिषद निवडणूकांच्याठिकाणी प्रचारसभा घेऊन विरोधकांच्या मनात धडकी भरवली आहे. शिवाय आता दोन दिवस भंडारा-गोंदियाच्या पोटनिवडणुकीसाठीही ते प्रचाराची राळ उठवणार आहेत. याशिवाय पक्षाची बाजू भक्कमपणे मिडीयासमोर मांडणारे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक हेही दोन दिवस प्रचाराची राळ उठवणार आहेत.

आजपासून भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रचारात उतरत आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विधानपरिषदांच्या निवडणुकीमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल हे भंडारा-गोंदियाच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार मधुकर कुकडे यांच्यासाठी प्रचारसभा आणि मतदारांशी संपर्क साधत आहेत.

शिवाय प्रदेशाध्यक्ष पाटील आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेतेही आजपासून दोन दिवस भंडारा-गोंदियाच्या निवडणूक प्रचारामध्ये उतरत सभा घेणार आहेत. आजपासून पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक हेही दोन दिवस भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणूक प्रचारामध्ये उतरणार असून, त्यांच्या प्रचाराची तोफ धडाडणार आहे. नवाब मलिक हे दोन दिवस गोंदियामध्ये प्रचारसभा घेणार आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link