पुणे : ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘गीत रामायण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी, २४ ऑगस्ट रोजी ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह’ येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे’, अशी माहिती ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम मालिकेतील हा ५२ वा कार्यक्रम आहे.
विक्रम पेंढारकर प्रस्तुत या कार्यक्रमात वर्धन पेंढारकर, अथर्व बुरसे हे किशोरवयीन गायक गीत रामायणातील निवडक गीते सादर करून, गदिमा आणि बाबूजींना स्वरांची मानवंदना देणार आहेत. मैत्रेयी पेंढारकर आणि वैशाली जोशी हे त्यांना साथ करणार आहेत. ‘चार वर्षांपूर्वी या कार्यक्रमास सुरूवात केली असून, आतापर्यंत दहा कार्यक्रम सादर करण्यात आले आहेत’, असे विक्रम पेंढारकर यांनी सांगितले.
‘कार्यक्रमाचे निवेदन वैशाली जोशी करणार असून, प्रसाद वैद्य (तबला), उद्धव कुंभार (ताल वाद्ये), चारूशीला गोसावी (व्हायोलिन) हे साथ संगत करतील’, अशी माहिती यांनी विक्रम पेंढारकर यांनी दिली.
कार्यक्रमाविषयी :
‘गीत रामायण’
स्थळ : ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह’, भारतीय विद्या भवन.
वेळ : शुक्रवार,२४ ऑगस्ट, सायंकाळी सहा वाजता