Next
पेठा-कोकोनट मिठाई
BOI
Wednesday, October 25 | 09:45 AM
15 0 0
Share this story

पेठा-कोकोनट मिठाई

शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे मुलांना डब्यात काय द्यायचे या प्रश्नापासून तूर्तास तरी सुटका आहे. पण दिवाळीच्या काळात नातेवाईकांना डब्यात काय नवीन द्यायचं हा एक मोठा प्रश्न असतोच. यासाठीच ‘पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी’ या सदरात या वेळी आपण पाहत आहोत असाच एक अनोखा पदार्थ, पेठा-कोकोनट मिठाई...
................... 

दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच. मग प्रत्येकाकडे तोच तोच फराळ खाऊन पार कंटाळा येतो. अशा वेळी आपण नातेवाईकांना देत असलेल्या डब्यात एखादा नवीन पदार्थ देता आला तर..? असाच एक मजेशीर पदार्थ आज पाहूया. अत्यंत सुटसुटीत, गॅस व साखरेची वेगळी गरज नसलेला हा पदार्थ दिसायला व चवीलाही एकदम शाही आहे. यासाठी लागणारे साहित्यही फार सुटसुटीत आहे. पदार्थ तयार करण्यास केवळ १५ मिनिटे पुरतील.  

साहित्य : 
टुटीफ्रुटीपेठा - १०० ग्रॅम, खवा - १५० ग्रॅम, डेसीकेटेड कोकोनट - ५० ग्रॅम, आवडीप्रमाणे सुका मेवा (यात बदाम, काजू व पिस्ता छान लागतो), टुटीफ्रुटी – दोन चमचे.

कृती : 
- सर्वप्रथम पेठा व खवा किसून घ्या.
- त्यात २५ ग्रॅम ड्रायफ्रुट घाला.
- आता त्यात डेसीकेटेड कोकोनट मिसळा. 
- हे मिश्रण हलक्या हाताने एकत्रित करून घ्या. 
- तयार मिश्रणाचा गोळा तयार करून घ्या.
- या मोठ्या गोळ्याचे आता छोट्या आकाराचे गोळे करा.
- त्यांना गोल किंवा लांब चमच्यासारखा अंडाकृती आकार द्या. 
- या छोट्या गोळ्यांना डेसीकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घ्या व वरून टुटीफ्रुटीने सजवा. 
- पांढरी मिठाई व त्यावर रंगीबेरंगी टुटीफ्रुटी खूपच आकर्षक दिसते.

- आश्लेषा भागवत
मोबाइल : ९४२३० ०८८६८ 
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link