Next
इंदूर ठरले सर्वांत स्वच्छ शहर
BOI
Thursday, May 04, 2017 | 04:07 PM
15 5 0
Share this article:

नवी दिल्ली : देशातील स्वच्छ शहरांची यंदाची मानांकने जाहीर झाली असून, मध्य प्रदेशातील इंदूर आणि भोपाळ या शहरांनी पहिली दोन स्थाने पटकावली आहेत. एकूण ४३४ शहरांची यादी केंद्रीय नगरविकासमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी जाहीर केली. त्यात पहिल्या दहा शहरांत मध्य प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशातील प्रत्येकी दोन, तर महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आणि दिल्लीतील एका शहराचा समावेश आहे. या यादीत नवी मुंबई आठव्या, पुणे १३व्या, तर बृहन्मुंबई २९व्या स्थानावर आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणानंतर ही मानांकने जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत गुजरातमधील सर्वाधिक ५० शहरांचा समावेश असून, महाराष्ट्रातील ४४ शहरे यात आहेत.

पहिल्या दोनशे शहरांत उत्तर प्रदेशातील केवळ चार शहरांचा समावेश आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहरासह (३२) अलीगढ (१४५), झाशी (१६६), कानपूर (१७५) या शहरांचा समावेश आहे. तसेच उत्तर प्रदेशातील तब्बल ५० शहरे सर्वांत गलिच्छ शहरांच्या यादीत आहेत. 

‘टॉप टेन’ स्वच्छ शहरे :
इंदूर (मध्य प्रदेश), भोपाळ (मध्य प्रदेश), विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), सुरत (गुजरात), म्हैसुरू (कर्नाटक), तिरुचिरापल्ली (तमिळनाडू), नवी दिल्ली महापालिका (दिल्ली), नवी मुंबई (महाराष्ट्र), तिरुपती (आंध्र प्रदेश), बडोदा (गुजरात)

महाराष्ट्रातील शहरे आणि त्यांचे यादीतील क्रमांक :
नवी मुंबई (८), पुणे (१३), बृहन्मुंबई (२९), शिर्डी (५६), पिंपरी-चिंचवड (७२), चंद्रपूर (७६), अंबरनाथ (८९), सोलापूर (११५), ठाणे (११६), धुळे (१२४), मिरा-भाईंदर (१३०), नागपूर (१३७), वसई-विरार (१३९), इचलकरंजी (१४१), नाशिक (१५१), सातारा (१५७), कुळगाव बदलापूर (१५८), जळगाव (१६२), पनवेल (१७०), कोल्हापूर (१७७), नंदुरबार (१८१), अहमदनगर (१८३), नांदेड-वाघाळा (१९२), उल्हासनगर (२०७), उस्मानाबाद (२१९), परभणी (२२९), यवतमाळ (२३०), अमरावती (२३१), कल्याण-डोंबिवली (२३४), सांगली-मिरज-कुपवाड (२३७), मालेगाव (२३९), उदगीर (२४०), बार्शी (२८७), अकोला (२९६), औरंगाबाद (२९९), बीड (३०२), अचलपूर (३११), वर्धा (३१३), लातूर (३१८), गोंदिया (३४३), हिंगणघाट (३५५), जालना (३६८), भिवंडी-निझामपूर (३९२), भुसावळ (४३३)

शहरांच्या स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा
 ‘या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीदरम्यान शहर विकास मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणाला १८ लाख नागरिकांनी प्रतिसाद दिला होता. त्यामुळे हे आतापर्यंतचे सर्वांत मोठे सर्वेक्षण होते. भारतीय गुणवत्ता परिषदेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर असे लक्षात आले, की सर्वेक्षणाचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. गेल्या वर्षभरात स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. मानांकने जाहीर झाली आहेत; मात्र मानांकनापेक्षा नागरिकांचा प्रतिसाद अधिक उत्साहवर्धक आहे,’ असे एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत केल्या जात असलेल्या प्रयत्नांचा शहरी भागांमधील स्वच्छतेवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे यातून दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.
 
15 5 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search