Next
‘रुबी’तर्फे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर
प्रेस रिलीज
Monday, June 18, 2018 | 05:43 PM
15 0 0
Share this article:

पुणे : रुबी हॉल क्लिनिक व एसीई ५१२ एस वर्कर​ ​युनियन यांच्यातर्फे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अ‍ॅम्युनेशन फॅक्टरीजवळील ५१२ आर्मी बेस वर्कशॉप खडकीला या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या अभिनव पुढाकारामुळे ५१२ आर्मी बेस वर्कशॉपच्या दोन हजारांहून अधिक कर्मचार्‍यांना फा​​यदा झाला.या शिबिरामध्ये रुबी हॉल क्लिनिकच्या आर्थोपेडिक, दंतचिकित्सक, ऑप्थोलमोलॉजिस्ट आणि आँकोलॉजिस्ट व पॅरामेडिकल स्टाफ सहभागी झाला होता. या शिबिरामध्ये कर्मचार्‍यांची तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली व मोफत सल्ला मार्गदर्शन केले. रुबी हॉल क्लिनिकतर्फे श्रीहरी शिंदे, अलीम शेख व तुषार शिरसाठ हे उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय सेवांचे संचालक डॉ. संजय पठारे म्हणाले की, ‘रुबी हॉल क्लिनिक आपल्या प्रत्येक कार्यात मुल्ये जपण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येक दिवशी आम्ही सकारात्मक वातावरण आणि रुग्णकेंद्रित सेवा करताना सर्वोत्कृष्ट परिणाम प्रदान करण्याचा प्रयत्न करतो. ग्रँट मेडिकल फाउंडेशनअंतर्गत आम्ही विकासाचे समग्र प्रारूप आणि विना नफा तत्त्वांवर घेण्यात येणार्‍या प्रयत्नांना सहकार्य केले जाते. त्याशिवाय समाजाला जास्तीत जास्त फायदा होईल अशा प्रकारच्या चांगल्या पुढाकाराअंतर्गत कार्य केली जातात, विशेषत: आरोग्यक्षेत्र आणि बालसेवा यांचा समावेश आहे. रुबी हॉल क्लिनिक अशा प्रकारच्या चांगल्या उपक्रमांना नेहमीच सहकार्य करत राहील.’

विपणन प्रमुख अलंकार गोडबोले म्हणाले, ‘आम्ही भविष्यामध्ये शासकीय संस्थांसाठी अशा प्रकारच्या जास्तीत जास्त उपक्रमांचे आयोजन करणार असून, त्याबरोबरच समाजासाठी देखील हे उपक्रम आयोजित केले जातील.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search