Next
गणेशोत्सव देखावा स्पर्धा
प्रेस रिलीज
Thursday, August 10, 2017 | 05:57 PM
15 0 0
Share this article:

पुणे : वंचित विकास आणि शिरीष हरी कुर्लेकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने गणेशोत्सवात देखावा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी स्त्री-पुरुष समानता, बेटी बचाओ-बेटी पढाओ, अवयवदान, नेत्रदान-त्वचादान असे चार विषय असणार आहेत, अशी माहिती वंचित विकासचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका मीना कुर्लेकर, सुनिता जोगळेकर यांनी दिली. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाला अनुक्रमे १५ हजार, १०हजार व ५ हजार अशी रोख पारितोषिके व प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. सहभागी प्रत्येक मंडळाला प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ‘पुण्याचे वैशिष्ट्य असलेल्या गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी शहरासह परिसरातील व पुण्याबाहेरील लोक येतात. देखाव्यांमधून अनेक सामाजिक विषय मांडले जातात. अशा या जनजागृतीपर देखाव्यांची स्पर्धा संस्थेच्या वतीने अयोजित केली आहे,’ असे आयोजकांनी म्हटले आहे.


अधिक माहितीसाठी संपर्क :
दूरध्वनीक्रमांक : ०२०-२४४५४६५८, २४४८३०५०
ईमेल : vanchitvikas2007@rediffmail.com, vanchitvikas85@gmail.com
पत्ता : वंचित विकास संस्था कार्यालय, मोदी गणपतीजवळ, नारायण पेठ.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search